डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत सातबारा वितरणाचा कर्जत तालुक्यात शुभारंभ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत सातबारा वितरणाचा कर्जत तालुक्यात शुभारंभ

कर्जत प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनातील महसूल विभागाच्या वतीने संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत सातबारा व

गांधी जयंतीनिमित्त तरडगाव ग्रामस्थांनी घेतली ग्रामस्वच्छतेची शपथ
कर्जत तालुक्यातील खेड गावामधील गरीब कुटुंबातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना गावगुंडाकडून मज्जाव.
उपसरपंच लहु शिराळे मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

कर्जत प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनातील महसूल विभागाच्या वतीने संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीकृत मोफत सातबारा वाटप करण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला. कर्जत तालुक्यात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

 कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील प्रत्येक सझेच्या किमान एका गावात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. तलाठ्याकडून खातेदार शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सातबारा देण्यात येत आहेत.

याशिवाय गावातील माजी सैनिक अथवा कार्यरत सैनिक यांचे कुटुंबीय, १९४७ सालात जन्म झाला आहेत असे खातेदार, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे असे शेतकरी, २ ऑक्टोबर ही जन्मतारीख असलेले खातेदार, गावातील वरिष्ठ महिला खातेदार यांना मोफत सातबारा वितरित करून योजनेचा शुभारंभ करण्यात येत आहे.

 थेरवडी येथे तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या उपस्थितीत गांधी जयंती साजरी करण्यात आली. शेतकरी खातेदारांना मोफत डिजिटल स्वाक्षरी युक्त सातबाराचे वाटप करण्यात आले. नागापूर येथे निवासी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे तसेच निंबोडी येथे महसूलचे नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले तसेच संबंधित गावचे ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

COMMENTS