टी – २० वर्ल्डकपसाठी पंचांची घोषणा… भारताचा एकमेव पंच…

Homeताज्या बातम्याविदेश

टी – २० वर्ल्डकपसाठी पंचांची घोषणा… भारताचा एकमेव पंच…

दिल्ली : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी आगामी पुरुषांच्या टी-20 विश्वचषकाच्या फेरी एक आणि सुपर 12 टप्प्यासाठी 20 सामना

परतीच्या पावसाला सुरुवात… हवामान विभागाने केले जाहीर…
Yogi Adityanath : “पुराव्याशिवाय कोणालाही अटक होणार नाही” (Video)
दहशतवाद्यांनो…! हिंमत असेल तर समोर या (Video)

दिल्ली : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी आगामी पुरुषांच्या टी-20 विश्वचषकाच्या फेरी एक आणि सुपर 12 टप्प्यासाठी 20 सामना अधिकार्‍यांच्या नियुक्तीची घोषणा केली असून, यात पंचांमध्ये नितीन मेनन एकमेव भारतीय आहेत. 

अनुभवी दक्षिण आफ्रिकेचे पंच मराईस इरास्मस आणि इंग्लंडचे ख्रिस गफाने हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 24 ऑक्टोबरच्या सामन्यासाठी मैदानावरील दोन पंच असतील तर रिचर्ड इलिंगवर्थ टीव्ही अधिकारी असतील. डेव्हिड बून मॅच रेफरी असतील.

टी-20 विश्वचषकासाठी 16 पंच आणि चार मॅच रेफरी निवडले गेले आहेत. 45 सामन्यांच्या या स्पर्धेत अलीम दार, इरास्मस आणि रॉड टकर असे तीन पंच असतील, जे त्यांच्या सहाव्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषकात अधिकारी असतील. 

भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथचाही समावेश मॅच रेफरीमध्ये आहे. मस्कट (ओमान), अबुधाबी, शारजाह आणि दुबई (संयुक्त अरब अमिरात) येथे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी सामन्याचे अधिकारी योग्य वेळी जाहीर केले जातील.स्पर्धेच्या सर्व सामन्यांसाठी तटस्थ पंच असतील. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडचे ख्रिस गफाने आणि श्रीलंकेचे कुमार धर्मसेना हे पंच असतील. ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात हा सामना रंगणार आहे.

COMMENTS