टाकळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेचे पूजन

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

टाकळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेचे पूजन

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यात पोहेगाव,दहेगाव(बोलका)टाकळी ब्राम्हणगाव आरोग्य केंद्रांस मिळालेल्या एकुण  तिन रुग्णवाहिकांचे नुकतेच आमदार आशुतोष काळे यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले.

Ahmednagar : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त साहसी रॅपलिंग l LokNews24
आ.प्राजक्त तनपुरे यांच्यावर नगर,नाशिकची जबाबदारी
शेतकरी आणि वीज वितरण अधिकारी यांच्यामध्ये अड.प्रताप ढाकणे यांनी घडवून आणली चर्चा



कोपरगाव प्रतिनिधी -जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यात पोहेगाव,दहेगाव(बोलका)टाकळी ब्राम्हणगाव आरोग्य केंद्रांस मिळालेल्या एकुण  तिन रुग्णवाहिकांचे नुकतेच आमदार आशुतोष काळे यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले.
     शनिवारी  प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी ब्राम्हणगाव येथे रूग्ण कल्याण समितीची मिटींग संपन्न झाली. सदर मिटींग प्रसंगी  आरोग्य  केंद्रास उपलब्ध झालेल्या नविन रुग्णवाहिकेचे पुजन करण्यात आले.  रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष  कारभारी आगवण,  पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, सरपंच संदीप देवकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष विधाते, वैद्यकीय अधिकारी डॉ विकास घोलप आणि कर्मचारी वृंद यांचे हस्ते पार पाडले. प्रा. आ. केंद्र टाकळी ब्राम्हणगाव यांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजना उत्तम रितीने राबविलेबद्दल सर्व आरोग्य कर्मचारी, अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका यांचे अभिनंदन केले. कोरोना लसिकरणाचे उत्कृष्ट नियोजन केलेबद्दल डॉ. विकास घोलप यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

COMMENTS