नुकत्याच झालेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षात ज्योती सहकारी पतसंस्थेला २.४० कोटींचा नफा झाला.
कोपरगाव शहर प्रतिनिधी- नुकत्याच झालेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षात ज्योती सहकारी पतसंस्थेला २.४० कोटींचा
नफा झाला. संस्थेचा एकत्रित व्यवसाय ३६४ कोटी इतका झाला असुन यामध्ये २२२ कोटी रूपयांच्या ठेवी तर १४२ कोटी रुपयांची कर्ज वितरीत केली आहे.संस्थेची गुंतवणूक ९६ कोटी रूपयांची इतकी झाली आहे असून कोविडच्या काळात देखील संस्थेने आपले कामकाज अखंडपणे चालू ठेवत ग्राहकांना, खातेदारांना नियोजनबद्ध नम्र व जलद सेवा दिली आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन अड.रविकाका बोरावके यांनी दिली. बोरावके यांनी माहिती देतांना सांगितले की, सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने संस्थेच्या भागभांडवलात व व्यवसायातसमाधानकारक वाढ झाली आहे. लेखापरिक्षण वर्गात सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके संस्थेने पूर्ण करून सन २०१९- २०२० या मागिल आर्थिक वर्षासाठी शासकीय लेखा परिक्षणात ‘अ’ वर्ग मिळवलाआहे. तसेच २०२०- २१ या आर्थिक वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव असतांना देखीलसंस्थेने आवश्यक ती प्रमाणके पुर्ण करुन ठेवी, कर्ज, भागभंडवल व गुंतवणूक या सर्वामध्ये वाढ करून मागील वर्षांच्यातुलनेत एनपीएचे प्रमाण कमी करण्यात संस्थेस यश आले आहे.
सामान्य नागरीक , व इतर संस्थासाठी ठेवीच्या व कर्जा करिता कमीत कमी व्याजदराने कर्ज वितरीत केलेले आहे. त्यास खातेदारांनी उत्तमरीत्या प्रतिसाद देत. नव्या वर्षात छोटया मोठया उदयोजकांना व्यवसाय वाढीसाठी कमी व्याजदराच्या कर्ज योजना योजना सुरू करणार असल्याचे यावेळी बोरावके यांनी सांगितले.
कर्ज वसुलीसाठी काही कर्जदाराबरोबर कठोर निर्णय घ्यावे लागले. मात्र त्यामुळे कर्ज वसुली चांगली झाली यापुढे यात सातत्य राखले जावुन नेहमीच ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल असे संस्थेचे चेअरमन अॅड रविकाका बोरावके यांनी सांगितले. मागील आर्थिक वर्षात कोरोना संकटात सभासद , ठेवीदार ,कर्जदार व हितचिंतकासाठी सुमारे ३०ते ३५ हजार ‘ असैनिक अल्बम ३०’ या रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या गोळ्यांचे वाटप तज्ञ डॉक्टराच्या सल्ल्याने केलेले आहेत. तसेच संस्थेने नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेतलेला आहे.संस्थेच्या प्रगतीत सभासद , देवीदार , खातेदार व ज्योती मंगल ठेव प्रतिनिधी संस्थेचे सर्वसंचालक , शाखाधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचा सहकार्यानेच हे सर्व शक्य असल्याचे संस्थेचे चेअरमन रविकाका बोरावके यांनी सागितले.
COMMENTS