ज्यांनी आमच्याशी विश्वासघात केला त्यांचे काय झाले ते महाराष्ट्रात पहा… आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्यांनी आमच्याशी विश्वासघात केला त्यांचे काय झाले ते महाराष्ट्रात पहा… आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

सिल्वासा : प्रतिनिधी दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून, आज सिल्वासा येथे शिवसेनेचे उमेदवार कलाबेन डेलकर यांच्

…तर, तुरुंगात जाईन, शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते
गद्दारांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होतय 
मुंबईचा जोशीमठ करू नका

सिल्वासा : प्रतिनिधी

दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून, आज सिल्वासा येथे शिवसेनेचे उमेदवार कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची सभा झाली. 

यावेळी सभेला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचे म्हणत, विश्वास व्यक्त केला.

दरा आदित्य ठाकरे म्हणाले, की या भागाशी आणि शिवसेनेचे फार जुने नाते राहिले आहे. २२ वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती. त्यानंतर आज मी ठाकरे कुटुंबातील सदस्य म्हणून येथे आलेलो आहे. 

येथील लोकांना, भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना ही निवडणूक लढत आहे. डेलकर कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कलाबेन यांना आम्ही उमेदवारी दिली आहे. शिवसेना नेहमीच अन्यायाविरोधात उभी राहिली आहे.

आपल्याला दिल्ली हलवायची आहे. शिवसेना कधीही दिल्लीविरोधात गेलेली नाही. केवळ दिल्लीत बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. शिवसेनेला या भागाचा विकास करायचा आहे. यासाठी खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याकडे लक्ष घालणार असून, 

ते विजयी सभेसाठी येथे येणार आहेत. सभेला झालेली गर्दी लक्षात घेता कलाबेन विजय होणार हे मी आताच जाहीर करतो. इथले लोक शिवसेनेला किती मानतात हे यावरून दिसत आहे. २२ वर्षांपूर्वी बाळासाहेब येथे आले होते.

मात्र तेव्हा दोन प्रवाह होते. मात्र विचारधारा एक होती. आता दोघांचे विचार एकत्र आले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा विजय नक्कीच होणार असा दावाही त्यांनी यावेळी केला. आदित्य ठाकरे यांनी येवले भाजपवरही निशाणा साधला. शिवसेना कधीही खोटे बोलत नाही. 

ज्यांनी आमच्याशी विश्वासघात केला त्यांचे काय झाले याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रात बघायला मिळाले. शिवसेना गाजर देत नाही, लोकांना दिलेला शब्द पाळते. या भागाचा विकास करणार असा शब्द मी तुम्हाला देतो, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

COMMENTS