जुगार खुलेआम चालू असल्याने पोलीस प्रशासन झोपले काय?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुगार खुलेआम चालू असल्याने पोलीस प्रशासन झोपले काय?

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील आठवडी बाजारात सोरट लाल, काळी यासह पत्ते,अवैध दारू विक्री यासह जुगार खुलेआम चालू असल्याने पोलीस प्रशासन झोप

शेतकऱ्यावर गोळीबार करणारा आरोपी कर्जत पोलिसांकडून उस्मानाबादमधून जेरबंद
कर्जत व पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई : ६० लाखांची रोकड केली हस्तगत
पुण्यात भर रस्त्यात महिला पोलिसाकडून हमालाला मारहाण

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील आठवडी बाजारात सोरट लाल, काळी यासह पत्ते,अवैध दारू विक्री यासह जुगार खुलेआम चालू असल्याने पोलीस प्रशासन झोपले काय? असा सवाल उपस्थित होत आहे.  अलीकडेच आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. 

या चोरट्यांचा शोध आद्यपर्यत गुलदस्त्यात आसताना आता  आठवडी बाजारात अवैध धंदे चालू असताना पोलीस कारवाई का करत नाहीत. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहेशिवाय कुंभार पिंपळगाव पोलीस चौकी अंतर्गत चोरट्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.  चोरट्यांचा तपास अद्याप पर्यंत ही लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

बाजारात अवैध धंदे चालक लोकांच्या डोळ्यात धूळ टाकत लोकांची लूट करत आहेत. जास्त पैश्याचे आमीष दाखवून लोकांची आर्थिक लूट करताना दिसत आहेत.याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून अवैध धंदे चालकांवर कारवाईची मागणी होत आहे

COMMENTS