जिल्ह्याला कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचे पुरेसे डोस तातडीने द्यावेत

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

जिल्ह्याला कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचे पुरेसे डोस तातडीने द्यावेत

नगर जिल्ह्याला कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचे पुरेसे डोस तातडीने द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दोन वर्षांपूर्वीच्या किरकोळ वादातुन एकाचा मृत्यू;पाथर्डी तालुक्यातील घटना
कोतुळमध्ये पोलिस दलाचे पथ संचलन
दुचाकीस्वाराला जखमी करून पळून जाणाऱ्या पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर जिल्ह्याला कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचे पुरेसे डोस तातडीने द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तातडीने जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण न झाल्यास कोरोना उद्रेक पुन्हा होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे लसीकरणाचे अधिक डोस उपलब्ध झाल्यास कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल. तरी नगर जिल्ह्यासाठी कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसींचा तातडीने पुरवठा करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

यात पुढे म्हटले आहे की, जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नगर जिल्ह्यात ऑक्सिजन सिलेंडर व रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत होता. नगर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सुमारे 2 ते 3 हजारापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या होती. यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन पाठवून शिवसेना नगर दक्षिण जिल्हाप्रमुख दळवी यांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर जिल्ह्याची गरज मुख्यमंत्र्यांनी तातडीने पूर्ण केली होती. आताही सद्य परिस्थितीबाबत निवेदनाद्वारे दळवी यांनी पुन्हा एकदा विविध मागण्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केल्या असून, त्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात रुग्ण संख्या कमी होत असताना नगर जिल्ह्यात ही संख्या वाढतेच आहे. कोरोनाचे हे युद्ध जिंकण्यासाठी औषधोपचारांबरोबरच लसीकरणाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. पण जिल्ह्याचे दुर्दैव असे की, लोकसंख्या 50 लाखांच्या आसपास असली तरी लसींचा पुरवठा मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. 18 ते 44 वयोगटातील 43टक्के व 45 ते 60 वयोगटातील 30 टक्के अशी 73टक्के लोकसंख्या आहे. या हिशेबाने 36 लाख 50 हजारजणांच्या लसीकरणासाठी 73 लाख डोस आवश्यक आहेत. 11 मेपर्यंत जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे 4 लाख 66 हजार 400 व कोवॅक्सिनचे 97 हजार 140 डोस मिळून एकूण 5 लाख 63 हजार 540 इतके डोस उपलब्ध झाले. हे प्रमाण खूपच कमी आहे. कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी नगर जिल्ह्यासाठी 50 टक्क्यांपर्यंत तरी लसीचे डोस उपलब्ध होणे आवश्यक आहेत. ते तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करताना दळवी यांनी, राज्याबरोबरच आपण नगर जिल्ह्याची काळजी घेतली असून, जिल्ह्यासाठी इंजेक्शन व ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले असल्याचेही आवर्जून निवेदनात नमूद केले आहे.

COMMENTS