जिल्ह्यात 10 ठिकाणी अवैध धंद्यावर छापे; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त ; 11जणांविरुद्ध गुन्हे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यात 10 ठिकाणी अवैध धंद्यावर छापे; 3 लाखांचा मुद्देमाल जप्त ; 11जणांविरुद्ध गुन्हे

अहमदनगर/प्रतिनिधी- जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुध्द राबवलेल्या विशेष धड़क मोहिमेंतर्गत दहा ठिकाणी छापे टाकून अकरा जणांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्

पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; आमदार निलेश लंकेकडे रोख
Pathardi : अतिवृष्टीने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त | Lok News24
Ahmednagar : कोठला व हवेली परिसरात सवार्यांचे दर्शन पूर्णपणे बंद l Lok News24

अहमदनगर/प्रतिनिधी- जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुध्द राबवलेल्या विशेष धड़क मोहिमेंतर्गत दहा ठिकाणी छापे टाकून अकरा जणांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येऊन दोन लाख 88 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुध्द कारवाईची विशेष मोहीम राबवून दि.22 ते दि. 23 जुलै 2021 चे दरम्यान दहा ठिकाणी छापे टाकून एकूण दोन लाख 88 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल गावठी हातभट्टीची तयार दारु, कच्चे रसायन, भट्टीची साधने जप्त करुन अकरा जणाविरुध्द श्रीगोंदा, सोनई, तोफखाना, नगर तालूका, पारनेर, श्रीरामपूर शहर व श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिशन कायदा कलम 65 (फ), (क), (ड), (ई) जप्त मुद्देमाल 34 हजार रुपये किंमतीची गावठी दारु, कच्चे रसायन व भट्टीची दारु असा जप्त करुन तात्या दौलतराव काळे, (रा. लिंपणगाव ता. श्रीगोंदा) याला अटक केली. नेवासा तालुक्यातील कौठा शिवारात चांदा ते कौठा रोडवरील दारु धंद्यावर छापा टाकून सोनई पोलिसांनी 17 हजार 500 रुपये किंमतीची गावठी दारु व कच्चे रसायन असा मुद्देमाल जप्त केला. आणि दास उर्फ दास्या सुरतमल भोसले, (रा.चांदा ते कौठा शिव रस्ता, कौठा शिवार ता. नेवासा) याला अटक केली. या प्रकरणी नेवासा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. कौठा शिवारातील दारु धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून 13 हजार रुपये किंमतीची गावठी दारु व कच्चे रसायन असा मुद्देमाल जप्त करून देविदास उर्फ काकासाहेब रामभाऊ वैरागर, (रा. चांदा ते कौठा शिव रस्ता, कौठा शिवार, ता. नेवासा) याला अटक केली. या प्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.
नगर शहरातील सावेडीतील पाईपलाईन रोड परिसरातील वैदुवाडी रोड येथील दारू धंद्यावर छापा टाकून पोलिसांनी चार हजार रुपये किमतीची गावठी दारू जप्त केली. पोलिसांनी साईबाबा लोखंडे (वय 45, राहणार वैदुवाडी, भिस्तबाग रोड, अहमदनगर) याला अटक करून त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.
नगर तालुक्यातील नेप्ती येथील हातभट्टी दारुच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून पोलिसांनी शरद पवार ( रा. नेप्ती. ता नगर) याला अटक केली.त्याच्याकडील 4 हजार रुपये किंमतीची गावठी दारु जप्त केली. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. नगर तालुक्यातील खंडाळा येथील हातभट्टी दारु धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून 30 हजार रुपये किंमतीची गावठी दारु, कच्चे रसायन असा मुद्देमाल जप्त करुन पोपट गिरधारी गिन्छे, (रा.खंडाळा ता.नगर) याला अटक केली. श्रीरामपूर शहरातील वडारवाडा येथील गावठी हातभट्टीच्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी नऊ हजार रुपये किमतीची गावठी दारू जप्त केली आणि बीबी राजू गायकवाडला अटक केली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडार गल्ली येथील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून 28 हजार रुपये किमतीचे गावठी दारु व कच्चे रसायन असा मुद्देमाल जप्त केला आणि शहादेव डुकरे (राहणार वडार गल्ली, टाकळीभान, श्रीरामपूर) याला अटक केली. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील वडार गल्लीमध्ये अन्य एका ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू धंद्यावर छापा टाकून 31 हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू, कच्चे रसायन असा मुद्देमाल जप्त केला. दारूधंदा मालक प्रकाश डुकरे (राहणार वडार गल्ली, टाकळीभान, श्रीरामपूर) याला अटक केली. टाकळीभान येथील वडारगल्लीतील गावठी हातभट्टी दारू धंद्यावर छापा टाकून पोलिसांनी एक हजार पाचशे रुपये किमतीचे गावठी दारू जप्त करून रजनी राजेंद्र जाधव (राहणार विठ्ठल मंदिराजवळ, टाकळीभान, तालुका श्रीरामपूर) यांना अटक केली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. पारनेर तालुक्यातील शिरापूर येथील गावठी हातभट्टी दारूधंद्यावर पोलिसांनी छापा टाकून एक लाख वीस हजार रुपये किमतीची गावठी दारू रसायन व भट्टीची साधने असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत बाबाजी मारुती चाटे (राहणार शिरपूर, तालुका पारनेर) याला अटक केली. त्याच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. जिल्ह्यातील अवैध दारू धंद्यांवर छापे टाकण्याची ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी ही कारवाई केली आहे.

COMMENTS