जिल्ह्यातील परळी पीपल्स ठेवीदारांच्या आशा पल्लवीत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यातील परळी पीपल्स ठेवीदारांच्या आशा पल्लवीत

अहमदनगर/प्रतिनिधी- श्रीरामपूर येथील परळी पीपल्स मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीत झालेल्या अकरा कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी दोन आरोपींना नगरच्या पोलि

गडहिंग्लज अर्बन बँके च्या “13 कोटी”अपहारातील दोघाना अटक! l पहा LokNews24
पाथर्डी तालुका टंचाई आढावा बैठकीचे आयोजन – आ. मोनिका राजळे
कर्जतमधील ६ दुकाने सील नगरपंचायतची धडक कारवाई ; व्यवसायिक संतप्त

अहमदनगर/प्रतिनिधी- श्रीरामपूर येथील परळी पीपल्स मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीत झालेल्या अकरा कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी दोन आरोपींना नगरच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या सोसायटीच्या नगर जिल्ह्यातील ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या सोसायटीच्या श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, शेवगावसह जिल्ह्यात पाच शाखा होत्या. पूर्वी परळी येथे मुख्यालय होते, नंतर नेवासा येथे मुख्यालय झाले होते. जिल्ह्यातील अनेक ठेवीदारांनी यात पैसे गुंतवले आहेत. पण गैरव्यवहार झाल्याने त्यांच्या ठेवी परत मिळणे मुश्किल झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर गैरव्यवहार करणारे दोघे पकडल्याने ठेवीदारांमध्ये पैसे परत मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
श्रीरामपूर येथील परळी पीपल्स मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अकरा कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने शिरुर व मुंबई येथून या दोन आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनी दिली. विश्‍वजीत राजेसाहेब ठोंबरे व प्रमोद खेडकर अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे, लक्ष्मण हंडाळ, मंगेश खरमाळे, बाळासाहेब जंबे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. सुमारे अठरा शाखा असलेल्या परळी पीपल्स सोसायटीच्या श्रीरामपूर शाखेत ठेवलेल्या ठेवी परत न मिळाल्याने ठेवीदाराने पोलिसात फिर्याद दिली होती. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने केला. या प्रकरणात पूर्वी अमित गोडसे याला अटक झालेली आहे. सोसायटीने ठेवीदारांकडून 11 कोटींच्या ठेवी गोळा केल्या होत्या. मात्र, त्या पैशांचा योग्य विनियोग न झाल्याने सोसायटी डबघाईला आली. परिणामी, ठेवीदारांना ठेवी परत मिळाल्या नाहीत. आर्थिक गुन्हे शाखेने याचा सखोल तपास केल्यानंतर यातील दोषी असलेल्यांवर कारवाई केली आहे. सोसायटीचा जनरल मॅनेजर असलेल्या ठोंबरे याला मुंबईतून अटक करण्यात आली. तर खेडकर याला शिरुरमधून अटक करण्यात आली आहे. या सोसायटीचे पूर्वी परळी येथे मुख्यालय होते व नंतर नेवासा येथे मुख्यालय झाले होते. तसेच श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, शेवगावसह जिल्ह्यात पाच शाखा होत्या. ठेवींचे ठेवलेले पैसे परत मिळत नसल्याच्या ठेवीदारांच्या तक्रारीनंतर झालेल्या लेखापरीक्षणात दोषी आढळलेल्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

गुंतवणूक करताना काळजी घ्या
नागरिकांनी अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करताना तेथील संचालकांची व त्यांच्या गुंतवणुकीची माहिती घेऊन खात्री करावी व नंतरच ठेवी ठेवाव्यात. विचारपूर्वक गुंतवणूक करावी, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनी केले आहे.

COMMENTS