जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची वाटचाल सहा हजारांकडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची वाटचाल सहा हजारांकडे

अहमदनगर/प्रतिनिधी-मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून (2020) सुरू झालेल्या कोरोना तांडवाने जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 925जणांचे मृत्यू झाले आहेत. सहा

महानगरपालिकेच्या कार्यालयात भरवले खड्ड्यांचे प्रदर्शन…
Aaurangabad : सार्वजनीक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणावर वाहनधारक नाराज (Video)
नगरकरांचं टेन्शन वाढलं , हा तालुका पुन्हा कोरोना हॉटस्पॉट वर ! l Ahmednagar l LokNews24 l

अहमदनगर/प्रतिनिधी-मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून (2020) सुरू झालेल्या कोरोना तांडवाने जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 925जणांचे मृत्यू झाले आहेत. सहा हजाराच्या दिशेने वाटचाल करणारा हा आकडा कोरोनाची भयानकता स्पष्ट करून जात आहे. दरम्यान, आता कोरोना बाधितांचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. दुसर्‍या लाटेचा प्रभावही ओसरू लागला असून, सध्या सव्वादोन हजारावर कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 72 हजार 988 असून, सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 2 हजार 306 आहे. शासनाच्या पोर्टलवर नोंदवलेल्या मृत्यूंची संख्या 5 हजार 925 असून, एकूण रुग्ण संख्या 2 लाख 81 हजार 219 झाली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून किमान तीन दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन साठा करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यादृष्टीने जिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. तसेच खासगी डॉक्टरांनाही त्यांना त्यांच्या रुग्णालयास लागणार्‍या ऑक्सिजनची निर्मिती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पारनेर अजूनही बाधित
जिल्ह्यातील नगर शहरासह बहुतांश तालुक्यांतून आता कोरोना बाधितांची संख्या एक आकडी झाली आहे. मात्र, पारनेरमध्ये अजूनही दोन आकडी रुग्णसंख्या दिसत आहे. प्रशासनाने त्यादृष्टीने पारनेरमध्ये विशेष मोहीम आखण्याची गरज आहे. शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 18, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 152 आणि अँटीजेन चाचणीत 236 रुग्ण बाधीत आढळले. 344 रुग्णांना डिस्चार्ज तर नव्याने 406 बाधितांची रुग्ण संख्येत भर पडली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.07 टक्के आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 4, जामखेड 1, नगर ग्रामीण 3, नेवासा 1, राहाता 1 आणि संगमनेर 8 अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 2, अकोले 2, जामखेड 3, कर्जत 1, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 4, नेवासा 5, पारनेर 23, पाथर्डी 12, राहाता 11, राहुरी 15, संगमनेर 22, शेवगाव 17, श्रीगोंदा 18, श्रीरामपूर 9 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. तसेच अँटीजेन चाचणीत 236 जण बाधित आढळून आले. मनपा 6, अकोले 15, जामखेड 25, कर्जत 31, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 8, नेवासा 29, पारनेर 31, पाथर्डी 24, राहाता 11, राहुरी 14, संगमनेर 5, शेवगाव 14, श्रीगोंदा 18, श्रीरामपूर 3 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 9, अकोले 16, जामखेड 16, कर्जत 21, कोपरगाव 9, नगर ग्रामीण 23, नेवासा 12, पारनेर 51, पाथर्डी 28, राहता 19, राहुरी 27, संगमनेर 18, शेवगाव 28, श्रीगोंदा 46, श्रीरामपूर 15 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दुकाने बंद…गर्दी कायम
नगर जिल्ह्याचा कोविड स्तर 3मध्ये समावेश असल्याने मागच्या आठवड्यापासून जिल्हा प्रशासनाने कोविड निर्बंध जारी केले आहेत. यात अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, किराणा, भाजीपाला-फळे विक्री, पशुखाद्य विक्री, दूध विक्रीसह अन्य सर्वप्रकारच्या व्यवसायांवर सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4पर्यंत सुरू ठेवण्याचे बंधन टाकले आहे व त्यानंतर सायंकाळी 5 पासून 5 पर्यंत संचारबंदी जारी असते. तसेच दर शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह सर्व दुकाने बंद ठेवण्याचेही बंधन आहे. मात्र, शनिवारी (3 जुलै) मेडिकल दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद होती. पण रस्त्यांवर वाहनांची गर्दी कायम होती. रस्त्यांच्या कडेला भाजी विक्रेतेही दिसत होते. किराणा दुकाने मात्र बंद होती. तसेच काही बंद दुकानांसमोर घोळक्याने काहीजण गप्पा करताना दिसत होते. काही चौकांतून पोलिस बंदोबस्त तैनात होता. मात्र, जमावबंदी लागू असताना घोळक्याने बसणारांकडे साधी विचारपूसही होत नव्हती. प्रवास व मालवाहतुकीला मुभा असल्याने रस्त्यांवर एसटी बसेस, चारचाकी व दुचाकी फिरताना दिसत होत्या. बँकांचेही कामकाज सुरू होते. रविवारीही (4 जुलै) असेच चित्र दिसण्याची शक्यता आहे.

COMMENTS