जिल्हा व्हाॅलीबाॅल संघटना आयोजित पंच परीक्षेत 37 पंचाची निवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा व्हाॅलीबाॅल संघटना आयोजित पंच परीक्षेत 37 पंचाची निवड

अहमदनगर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने व अहमदनगर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे वतीने घेण्यात आलेल्या पंच परीक्षेत 37 पं

कल्याण -विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर एकाच रात्रीतुन ६ वाहने पलटी
पाथर्डी पूर्व भागात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ऋषिकेश ढाकणे यांनी पाहणी केली
वित्त आयोग निधी अपहारप्रकरणी सरपंचासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने व अहमदनगर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे वतीने घेण्यात आलेल्या पंच परीक्षेत 37 पंच जिल्हा पंच परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हा व्हाॅलीबाॅल् असोसिएशनच्या वतीने दि.28 ते 30 सप्टेंबर रोजी व्हाॅलीबाॅल पंच  कार्यशाळचे आॅनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले होते. तसेच रविवारी दि.3 आॅक्टोंबर 2021 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, वाडियापार्क येथे झालेल्या प्रॅक्टिकल परीक्षेमधून 37 क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक व खेळाडू असे जिल्हा पंच परीक्षा उत्तीर्ण झाले.

तीन दिवस झालेल्या कार्यशाळेमध्ये आंतरराष्ट्रीय व्हाॅलीबाॅल पंच सुनील गिराम सोलापूर, आंतरराष्ट्रीय पंच शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू सौ.अंजली पाटील जळगाव, राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा अधिकारी राजेंद्र शिंदे, राष्ट्रीय पंच सौरभ रोकडे यांनी व्हाॅलीबाॅलमध्ये पंचाची भुमिका, नियम, पंचाचे इशारे तसेच व्हाॅलीबाॅल मार्गदर्शकाची भुमिका, खेळातील टेक्निक आदि विषयावर तीन दिवस मार्गदर्शन केले.

उत्तीर्ण झालेले पंच सुनिल मोहिते,  प्रमोद शेलार, नितीन निकम, बाबासाहेब पटारे, सुनिल मंडलिक, निवृत्ती घुले, जाहिद सय्यद, ज्ञानेश्वर भोत, मनिषकुमार सिंग, कार्तीक कराड, भारत शिंदे, सचिन मुखरे, संदिप निंभे, बाबासाहेब गायकवाड, दिपक जमदाडे, तस्लीम सय्यद, प्रथमेश ढेरेंगे, तेजस कुलकर्णी, सुरज जपे, दौलत पवार, धनंजय थोरात, अजय शिरसाट, बाबासाहेब उगले, सचिन ताजणे, बाबसाहेब क्षिरसागर, पोपटराव थोरात, प्रविण गुंजाळ, भुषण उर्कीडे, भागवत उगले, अनिल कुडाळ, अजित कदम, संजय आव्हाड, कृष्णा परदेशी, राजेंद्र शिरसाट, प्राजक्ता नलावडे, स्वीटी राठोड, सोनाली साबळे, प्राजक्ता आठरे, कोमल गायकवाड.

यावेळी  उत्तीर्ण झालेले पंचाना जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने टिशर्ट, व्हिसल व प्रमाणपत्र वितरण जिल्हा संघटनचे उपाध्यक्ष प्रा.रमेश मोरगावकर, शैलेश गवळी, सचिव लक्ष्मण म्हस्के सर, खजिनदार प्रा.संजय पाटील, सहसचिव प्रा बबनराव झावरे, पंच परीक्षा समन्वयक प्रा.डॉ. विजय म्हस्के, प्रा प्रताप भापकर आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

यशस्वी सर्व जिल्हा पंचाचे हार्दिक अभिनंदन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष माजी खा.प्रसादराव तनपुरे, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष व भारतीय व्हॉलीबॉल संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विजयभाऊ डांगरे, भारतीय व्हॉलीबॉल संघटनेचे सहसचिव व राज्य संघटनेचे सचिव शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय नाईक, सहसचिव व महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे कार्यकारणी सदस्य प्रा.निलेश जगताप, महाराष्ट्र रेफरी बोर्डाचे चेअरमन पी.एस.पंत व अहमदनगर जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी, खेळाडू यांनी केले आहे.

COMMENTS