Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या मुलाविरोधात बलात्काराची तक्रार

शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले राजेश विटेकर यांनी माझ्यासोबत अत्याचार केले, त्यांची आई विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, त्यांच्याकडून माझ्यावर वारंवार खोटे आरोप करण्यात येत आहे, गृहखाते आमचे आहे, सत्ता आमची आहे, माझ्याविरोधात गुन्हा दाखल करू शकणार नाही.

अखेर मान्सून अंदमानमध्ये दाखल
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे 10 दिवसांत काढण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेवरुन राजकारण.

पुणे /प्रतिनिधीः शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले राजेश विटेकर यांनी माझ्यासोबत अत्याचार केले, त्यांची आई विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, त्यांच्याकडून माझ्यावर वारंवार खोटे आरोप करण्यात येत आहे, गृहखाते आमचे आहे, सत्ता आमची आहे, माझ्याविरोधात गुन्हा दाखल करू शकणार नाही. बंदुकीचा धाक दाखवून, लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषण केले,असा आरोप एका शिक्षिकेने केला आहे. 

गेल्या वर्षभरापासून मी या अत्याचाराविरोधात पोलिस ठाण्यात गेले; परंतु कोणीही माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पवार मला मुलगा मानतात, ते माझ्यावर गुन्हा दाखल होऊ देणार नाहीत, असे विटेकरांनी धमकाल्याचा आरोप या शिक्षिकेने केला आहे. मी एक शिक्षक असून माझ्यावर असे अत्याचार होत असतील, तर इतर अशिक्षित महिलांवर किती अन्याय होत असतील, अशी विचारणा त्यांनी केली. खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार मला घरातले सदस्य मानतात, कोणीही माझे काही वाकडे करू शकणार नाही, सत्ताधारी पक्षातले नेते असे करत असतील आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? माझ्याविरोधात बदनामी करण्यासाठी खोटे आरोप केले जात आहे, तपास सुरू आहे, असे सांगत टाळाटाळ केली जाते, माझ्याकडे व्हॉट्सअप चॅटसह अनेक पुरावे आहेत. मुलींची अब्रु लुटायची आणि त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करायचा हा कुठला प्रकार? सुळे यांच्याकडे मी अनेकदा तक्रार केली; परंतु माझी दखल घेतली नाही, मी जिवंत आहे म्हणून तुम्हाला न्याय देऊ वाटत नाही का? विटेकर यांना पाठिशी घालण्याचे काम करत आहे, मला आणि माझ्या कुटुंबीयांना विटेकर यांच्याकडून धोका असल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे.

COMMENTS