नवी दिल्ली/प्रतिनिधी- दिल्लीतील भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर करण्यात आलेल्या निदर्शन
नवी दिल्ली/प्रतिनिधी- दिल्लीतील भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर करण्यात आलेल्या निदर्शनादरम्यान जातीवाचक घोषणाबाजी केल्याचा मुद्दा ऐरणीवर आला असून, या प्रक्षोभक भाषणाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
अश्विनी उपाध्याय व्यतिरिक्त विनोद शर्मा, दीपक सिंग, दीपक, विनीत क्रांती, प्रीत सिंह यांनाही अटक करण्यात आली आहे. प्रीत सिंह हे सेव्ह इंडिया फाउंडेशनचे संचालक आहेत, ज्यांच्या बॅनरखाली 8 ऑगस्ट रोजी जंतर -मंतर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्ली पोलीस मंगळवारी सकाळपासून या सर्वांची चौकशी करत आहेत, तर गुन्हे शाखाही या प्रकरणात सक्रिय आहे. घोषणा देणार्या पिंकी चौधरीचा दिल्ली पोलीस अजूनही शोध घेत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 153 अ आणि 188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या जंतर -मंतरवर आंदोलनादरम्यान लोकांनी जातीय घोषणाबाजी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आला होता, त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सोमवारी या संदर्भात गुन्हा दाखल केला. भारत जोडो आंदोलनाच्या वतीने जंतर -मंतरवर निदर्शने करण्यात आली होती. भारत जोडो आंदोलनाचे मीडिया प्रभारी शिप्रा श्रीवास्तव यांनी सांगितले की, आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी केले. मात्र, त्यांनी जातीय घोषणा देणार्यांशी कोणताही संबंध नाकारला आहे.
व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे
अश्विनी उपाध्याय म्हणाले की, व्हिडिओची सत्यता तपासली पाहिजे, जर ती खरी असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. जर व्हिडीओ बनावट असेल तर कारवाई करावी. आमचा दोष एवढाच आहे की, आम्ही भारत छोडो दिन साजरा करण्यासाठी, इंग्रजी कायद्यावर आक्षेप घेण्यासाठी गेलो होतो. अश्विनी उपाध्याय यांनी सांगितले की, त्यांनी व्हिडिओ अनेकवेळा पाहिला आहे. पण त्या घोषणा देणार्यांचा शोध लागला नाही. पोलिसांनी याची चौकशी करून त्यावर कारवाई करावी. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की अजून अटक होणार नाही, चौकशी केली तर आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू. माझी प्रकृती ठीक नाही, तरी देखील पोलिसांच्या सांगण्यावरून मी पोहोचलो आहे.
COMMENTS