जरे हत्याकांडातील आरोपी बोठेच्या पत्नीने धमकावले…;संबंधितांवर कारवाई करण्याची रुणाल जरेंची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जरे हत्याकांडातील आरोपी बोठेच्या पत्नीने धमकावले…;संबंधितांवर कारवाई करण्याची रुणाल जरेंची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या पत्नीने रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांना व त्यांच्या अंगरक्षकाला द

संगमनेर शहरात त्या ठिकाणी दुषित जलशुद्धीकरण संयंत्राला स्थानिकांचा विरोध
मंत्री गडाखांनी राजीनामा देण्याची मुरकुटेंची मागणी
मनपातील महाविकास आघाडीला बसणार झटका ; काँग्रेस आणणार मंगळवारी आसूड मोर्चा


अहमदनगर/प्रतिनिधी- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या पत्नीने रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांना व त्यांच्या अंगरक्षकाला दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रुणाल जरे यांनी संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना बुधवारी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, रुणाल जरे हे 27 जुलै रोजी त्यांच्या न्यायालयीन कामकाजासाठी पारनेर येथे गेले होते. रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याची पत्नी सविता बाळ बोठे हिने जरे यांच्या अंगरक्षकास एकेरी भाषेचा उपयोग करून दमबाजी करण्याचा प्रयत्न केला, असे निवेदनात म्हटले आहे. यात त्यांनी पुढे म्हटले की, 27 जुलै रोजी पारनेर पोलिस स्टेशन येथे ते वैयक्तिक काम करता गेले होते. यावेळी बाळ बोठे याची पत्नी सविता बोठे या पोलिस स्टेशनमध्ये असताना त्यांनी माझ्या अंगरक्षकास एकेरी भाषेत बोलून, रुणाल जरे यांचा अंगरक्षक पोलिस स्टेशनमध्ये का फिरतोय? कोणाच्या आदेशाने तू आज पारनेर पोलिस स्टेशन मध्ये फिरतोय? एवढा माज चढलाय का तुला? असे मोठ्या आवाजात बोलून माझ्या अंगरक्षकास दमबाजी करण्याचा प्रयत्न करून मला धमकावण्याचा प्रयत्न केला. याबाबत माझ्या अंगरक्षकाने पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या दालनात जाऊन सविता बोठे यांची तक्रार केली. यावेळी देखील सविता बोठे पोलिस निरीक्षक कार्यालयात मोठ्या आवाजातच बोलत होत्या. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पती (बाळ बोठे) जेलमध्ये असूनदेखील त्याची पत्नी कोणाच्या मदतीने माझा काटा काढू शकते, याची कल्पना मला आहे, असे जरे यांनी म्हटले आहे. सविता बोठे त्यांनी आत्तापासूनच मला धमकावण्याचा, दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच माझ्या अंगरक्षकाला धमकावून एकेरी भाषेचा वापर करून मला व माझ्या कुटुंबावर दबावतंत्राचा वापर करतील, त्यामुळे सविता बोठे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रुणाल जरे यांनी केली आहे.

आज बोठेच्या जामीनावर सुनावणी
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेच्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि.29 जुलै) रोजी सुनावणी होणार आहे. आरोपी बोठे याने 14 जुलै रोजी जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या प्रकरणातील पवार नावाच्या आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे बोठेच्या जामीन अर्जावरील निकालाची उत्सुकता आहे. रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी 102 दिवसानंतर हैदराबाद येथे अटक केली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

COMMENTS