Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जय हनुमान पथसंस्थेस 1 कोटी 2 लाखांचा नफा

येथील जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेत सन 2020-21 या आर्थिक वर्षाअखेर सर्व तरतुदी करून 1 कोटी 2 लाखांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे संचालक सुनील वैद्य यांनी दिली.

कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या | LokNews24
लग्नात हाराऐवजी गळ्यात टाकले खतरनाक साप I LOKNews24
शंकरराव गायकवाड मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा शाहू विद्यालयामध्ये गौरव

इस्लामपूर / प्रतिनिधी : येथील जय हनुमान नागरी सहकारी पतसंस्थेत सन 2020-21 या आर्थिक वर्षाअखेर सर्व तरतुदी करून 1 कोटी 2 लाखांचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे संचालक सुनील वैद्य यांनी दिली.

सुनील वैद्य म्हणाले, यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पूर्वीप्रमाणे बाजारात आर्थिक उलाढाल होत नाही. तरीही कुटुंबप्रमुख शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने राबवलेली धोरणे व कर्मचार्‍यांनी वसुलीसाठी प्रयत्न केले. 

सध्या भगिनी सूक्ष्म कर्जवाटपात संस्था जिल्ह्यात अग्रेसर असून कोरूना च्या अडचणीच्या काळात देखील संस्थेने सूक्ष्म कर्ज वाटपावर जास्त भर देऊन लहान लहान उद्योजकांना आर्थिक प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यवसायाला बळकटी दिली आहे. याचा वसूलही चांगल्या प्रकारे केला आहे. संस्थेचा 31 मार्च अखेर एकूण व्यवसायिक 93 कोटींचा आहे. 53 कोटी ठेवी असून कर्ज वाटप 40 कोटी आहे. संस्थेचा एकूण 7 कोटी आहे. वसूल भांडवल 2 कोटी 40 लाख आहे. गुंतवणूक 22 कोटी 50 लाख आहे. यावर्षी संस्थेच्या 3 नवीन शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे.

COMMENTS