जयवंत शुगर्सचा दुसरा हफ्ता 150 रूपयाचा शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग

Homeमहाराष्ट्रसातारा

जयवंत शुगर्सचा दुसरा हफ्ता 150 रूपयाचा शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग

धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याला सन 2020-21 या हंगामात ऊस घातलेल्या शेतकर्‍यांना प्रतिटन 150 रूपयांचा दुसरा हप्ता कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केला आहे. ही रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

दोघा भावांनी केली घरावर दगडफेक
माहीम किल्ल्यावरील अडीचशेहून अधिक झोपड्या हटवल्या
नाशिकमध्ये मोबाईलचा स्फोट होऊन 3 जण जखमी

संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांची घोषणा

कराड / प्रतिनिधी : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याला सन 2020-21 या हंगामात ऊस घातलेल्या शेतकर्‍यांना प्रतिटन 150 रूपयांचा दुसरा हप्ता कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केला आहे. ही रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकट काळात जयवंत शुगर्सने ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर ऊसबिलाची रक्कम उपलब्ध करून दिल्याने, शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जयवंत शुगर्सने सन 2020-21 च्या गळीत हंगामात 160 दिवसात एकूण 6 लाख 76 हजार 290 मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले. सरासरी साखर उतारा 12.57 टक्के राहिला आहे. तर 7 लाख 25 हजार 700 क्िंवटल साखर निर्मिती कारखान्याने केली आहे. कोरोनाच्या प्रतिकूल काळातही शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन कारखाना यशस्वीपणे चालविण्यात आला. कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पात आजअखेर 83 लाख 44 हजार लीटर अल्कोहोलची निर्मिती करून, त्यातून 80 लाख 18 हजार लीटर इथेनॉलचे उत्पादन घेण्यात आले आहे. या इथेनॉलची विक्री विविध ऑईल कंपन्यांना करण्यात आली आहे.
जयवंत शुगर्सने यापूर्वी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफआरपी रक्कम 3050 रूपयांपैकी 2600 रूपयांचा पहिला हफ्ता अदा केला आहे. तर एफआरपीचा दुसरा 150 रूपयांचा हफ्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केल्याने, शेतकर्‍यांना ऊसबिलापोटी आजअखेर प्रतिटन 2750 रुपये प्राप्त झाले आहेत.

COMMENTS