जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण पाच दहशतवादी ठार झाले आहेत. यात सुरक्षा दलाचे दोन जवानही जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यांत सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधात रात्रभर कारवाई सुरू होती.
चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या वाढून आता तीन झाली आहे. हादीपुरामधील कारवाईत आज आणखी दोन दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक अलिकडेच संघटनेट सामील झाला होता. सुरक्षा दलांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले होते. आम्ही दहशतवाद्याच्या आईवडीलांना चकमकीच्या ठिकाणी आणले होते. त्यांनी मुलाला शरण येण्याचे आवाहन केले. त्याला शरण यायचे होते; पण त्याच्या साथीदाराने त्याला अडवले, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. अनंतनागमधील आणखी एका कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले. ठार झालेले दोन्ही दहशतवादी हे टेरिटोरियल आर्मीतील जवान मोहम्मद सलीम यांच्या हत्येत सामील होते. गेल्या तीन दिवसांमध्ये काश्मीरमध्ये वेगवेगळ्या चकमकीत 12 दहशतवादी ठार झाले आहेत.
COMMENTS