मुंबई : राज्यात सावत्र भावांकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कोणीही माय का लाल आला तरी योजना बंद पडणार नाही. राज्य सरका
मुंबई : राज्यात सावत्र भावांकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कोणीही माय का लाल आला तरी योजना बंद पडणार नाही. राज्य सरकारच्या सर्व योजनांमध्ये आडवे येण्याचे काम विरोधक करत आहेत. मात्र त्यांना जनताच आडवे करतील असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला. सिडकोच्या विविध कामांच्या भूमिपूजन, लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
आमच्या कार्यकाळात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. हरियाणा मध्ये आमचा विजय होणार असे ढोल वाजत होते. मात्र हरियाणाच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. आता महाराष्ट्रात देखील तसेच होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मी गरीब कुटुंबातून आलो आहे. मी गरीबी पाहिलेली आहे. माझी आई कशी तगमग करायची. कशा पद्धतीने कुटुंब चालवायची, हे मी पाहिले आहे. त्यामुळे माझ्याकडे अधिकार येताच, सर्वात आधी आमच्या लाडक्या बहिणीसाठी हा निर्णय घेतला. लाडक्या बहिणींना पैसे दिले जात आहेत. हा निर्णय आम्ही का घेऊ नये? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला आहे. हे गोरगरिबांचे सरकार आहे. अधिकार्यांनी देखील सर्वसामान्यांचा विचार करूनच निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा एकही अधिकारी जागेवर ठेवणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. हे जनतेचे राज्य आहे. सर्वसामान्य व्यक्तीचे राज्य असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायूदलाचे सी-295 या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर सुखोई 30 या लढाऊ विमानानेही फ्लायपास केला. लँडींग करणार्या सी 295 विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्रीफडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, खासदार सर्वश्री श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, आमदार सर्वश्री गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, अपर मुख्य सचिव गृह डॉ. इकबाल चहल, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, विभागीय आयुक्त डॉ. देशमुख, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सी-295 विमान हे गांधीनगरहून तर सुखोई हे पुण्यातून आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी विमानाच्या कॉकपीठमध्ये बसून बाहेर हात उंचावला.
नवी मुंबई विमानतळ धावपट्टीची चाचणी यशस्वी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची शुक्रवारी यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायूदलाचे सी-295 या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविण्यात आले. तसेच विमानावार पाण्याचा फवारा मारत अनोखी सलामी देण्यात आली. याबरोबरच लढाऊ सुखोई 30 विमानानेही यशस्वी टेक ऑफ केलं. आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मार्च 2025 मध्ये हे विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू होईल. वेळेआधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सिडकोने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन केले. हे विमानतळ सर्वसामान्यांसाठी मोठे आश्रयस्थान बनेल तसेच यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखी वेग येईल, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS