जगात कोरोनाच नाही त्यामुळे मी ही मास्क घालत नाही : ना. जयंत पाटील

Homeताज्या बातम्या

जगात कोरोनाच नाही त्यामुळे मी ही मास्क घालत नाही : ना. जयंत पाटील

देशात आणि राज्यात कोरोना विस्फोट झालेला आहे.

राज्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा , 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध | Lok News24
श्रीगोंद्यात 832 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
वडिलांच्या आजारपणाला कंटाळून मुलाने केली वडिलांची हत्या

पंढरपूर / प्रतिनिधी : देशात आणि राज्यात कोरोना विस्फोट झालेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार लॉकडाऊन करण्याच्या विचारात असतानाच जगात कोरोनाच नाही. त्यामुळे मी ही आता मास्क न घालता काढून ठेवल्याचं धक्कादायक आणि तितकेचं बेजबाबदार वक्तव्य जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालकेंच्या प्रचार सभेत ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्य सरकारचे मंत्री किती गंभीर आहेत हे ही या निमित्ताने समोर आले आहे.

पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. ही बंदी झुगारून सध्या पंढरपुरात प्रचार सभा सुरू आहेत.

आज राझणी येथे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत प्रचार सभा झाली. मंत्र्यांच्या सभेत सोशल डिस्टन्सींग फज्जा उडाल्याचे ही दिसून आले. पोलीस काय कारवाई करणार याकडेच लक्ष लागले आहे.

COMMENTS