छगन भुजबळ निर्दोष… घोटाळ्याच्या आरोपातून न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छगन भुजबळ निर्दोष… घोटाळ्याच्या आरोपातून न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

प्रतिनिधी : मुंबई दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात

बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पोलिस अधिकार्‍याची धमकी
पतसंस्था चालविताना घ्यावयाची दक्षता यावर विचार मंथन बैठक
यंदा गहू उत्पादन वाढणार

प्रतिनिधी : मुंबई

दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातून छगन भुजबळ यांच्यासह सहा जणांना वगळण्यात आले आहे. 

विशेष म्हणजे, या प्रकरणी छगन भुजबळ यांना दोन वर्षे तुरुंगात घालवावे लागले होते. या प्रकरणात छगन भुजबळ यांनी आपलं नाव गुन्ह्यातून वगळावं अशी याचिका सत्र न्यायालयात दाखल केली होती.

भुजबळांच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने आज मोठा निर्णय देत, छगन भुजबळांना मुक्त केलं. या प्रकरणात यापूर्वी पाच जणांना दोषमुक्त करण्यात आले आहे. 

तेव्हा एसीबीने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांच्या काळात विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरूपाचा मिळाल्याचा आरोप होता. 

दिल्ली महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडेतेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आला होता.

दरम्यान या निर्णयानंतर छगन भुजबळ, पुतण्या समीर आणि मुलगा पंकज भुजबळ यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 

यावेळी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ, तनवीर शेख , इरम शेख , संजय जोशी , गीता जोशी , पीडब्ल्यूडी सचिव गंगाधर मराठे यांची  नावंही महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून वगळण्यात आली  आहेत. 

महाराष्ट्र सदन कथित घोटाळाप्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हाय कोर्टात धाव घेणार आहेत.

COMMENTS