चोरीच्या विविध गुन्ह्यांतील तीन आरोपींना पकडले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोरीच्या विविध गुन्ह्यांतील तीन आरोपींना पकडले

अहमदनगर/प्रतिनिधी- महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने चोरून नेणारा गुन्हेगार राजू काते तसेच शेतातील विहिरीवर असलेल्या इलेक्ट्रीक मोटारी चोरी कर

दरोडा व खुनाच्या गुन्ह्यातील फरारी सराईत गुन्हेगार जेरबंद
कृषी, वने व ग्रामविकासाच्या योजनांची सांगड घालून साधा गावाचा सर्वांगिण विकास : पोपटराव पवार
Kopargoan : आमदार आशुतोष काळेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी- महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन बळजबरीने चोरून नेणारा गुन्हेगार राजू काते तसेच शेतातील विहिरीवर असलेल्या इलेक्ट्रीक मोटारी चोरी करणारे अट्टल गुन्हेगार अनिकेत पारधे व सुरेश कटारे यांना तोफखाना पोलिसांनी सापळा रचून शिताफीने अटक केली. तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेऊन शोध घेत असताना सापळा रचून एकाला शिताफीने पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राजू साहेबराव काते (रा.भारस्कर कॉलनी, लालटाकी अहमदनगर) असे सांगितले.त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हयाची कबुली दिली. तसेच तोफखाना पोलिस ठण्यात दाखल असलेल्या इलेक्ट्रीक मोटार चोरीच्या गुन्ह्यातील अनिकेत सुनील पारधे (वय 23, रा. सातखोल्या, कोठी, अहमदनगर) व सुरेश शिवाजी कटारे (वय 21, रा. दूधसागर सोसायटी, केडगाव,अहमदनगर) यांना नगर शहरात अटक केली. ही कारवाई तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक सूरज मेढे, शकील सयद, पोलिस नाईक अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद ईनामदार, पोलिस कॉन्स्टेबल शैलेश गोमसाळे, सचिन जगताप,अनिकेत आंधळे यांनी केली.

COMMENTS