चिपळूणला पूराचा वेढा ; कोकणात हाहाकार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिपळूणला पूराचा वेढा ; कोकणात हाहाकार

आपत्कालीन मदतीचे साहित्यही पाण्यात, संपर्क यंत्रणा ठप्परत्नागिरी/प्रतिनिधी : मुंबईसह कोकणात सुरू असलेल्या पावसाने दाणादाण उडवली असून, चिपळूण शहराला प

परिवारातील नाते भावनांच्या धाग्याने बांधले तर कधीच तुटणार नाहीत – प.पू.डॉ.गौरवमुनी
एक देश, एक निवडणुकीवर प्रश्‍नचिन्ह
जिल्ह्यात पाथर्डी पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद:- पोलीस अधिक्षक मनोज पाटील

आपत्कालीन मदतीचे साहित्यही पाण्यात, संपर्क यंत्रणा ठप्प
रत्नागिरी/प्रतिनिधी : मुंबईसह कोकणात सुरू असलेल्या पावसाने दाणादाण उडवली असून, चिपळूण शहराला पूराचा वेढा पडला आहे. चिपळून एसटी बस डेपो संपूर्ण पाण्याखाली आला असून, बस देखील संपूर्ण पाण्यात बुडाल्या आहेत. याचबरोबर अनेक घरांंत पाणी शिरले आहे. विशिष्ठी आणि शिव नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं शहरात पाणी शिरले आहे. चिपळूणमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नागरिकांना 2005 च्या पुराची आठवण झाली. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. अनेक सोसायटी, घरांमध्ये पाणी शिरल्याने हजारो नागरिक पाण्यात अडकले आहेत. या नागरिकांना बचावासाठी एनडीआरएफचे पथक चिपळूणमध्ये पोहोचले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत व महाड हा परिसरही जलमय झाला असून, पुराने वेढा दिलेल्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने बैठक घेत प्रशासनाला तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेशही दिले. दरम्यान रायगडमध्ये बापलेक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुराचा सामना करण्यासाठी चिपळूण नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पावसाळ्यापूर्वी सज्ज होती. तीन बोटी, लाईफ जॅकेट, दोरखंड बोये आणि इतर सामग्रीचा आपत्कालीन यंत्रणेत समावेश होता. हे साहित्य इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या परिसरातील अग्निशमन केंद्रात ठेवण्यात आली होती अग्निशमन केंद्र पाण्याखाली गेल्यामुळे पालिकेची आपत्कालीन यंत्रणाही पुराच्या पाण्यात अडकली आहे. पालिकेच्या अधिकार्‍यांचे फोन लागत नाहीत. पालिका परिसरही पाण्यात गेला आहे. त्यामुळे पालिकेतील अधिकारी चिपळूण पोलीस ठाण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यातून शक्य होईल तेवढे मदत कार्य सुरू आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळं नद्यांना पूर आला आहे. तर, एसटी स्टँड, परशुराम नगर पसिरात पाणी सातत्याने वाढत आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. तर, एसटी बस आगाराला तळ्याचं स्वरुप आलं आहे. याशिवाय अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून अनेक जण घरात अडकले आहेत. एनडीआरएफनं बचावकार्य हाती घेतलं असून एनडीआरएफचे एक पथक नुकतेच मुंबईहून चिपळूणमध्ये पोहोचले आहे. त्यामध्ये 45 जवान असून पाच बोटी आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही बचावकार्य सुरू झाल्याची माहिती दिली आहे. गंभीर स्थिती असलेल्या घटना स्थळी लवकरात लवकर हेलिकॉप्टर सुविधा पोहचविण्याचे आदेश देण्यात आलेले असून संपूर्ण परिस्थितीवर आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग सतत लक्ष ठेवून आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर, चिपळूणकरता एनडीआरच्या दोन टीम रवाना झालेले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी वेगाने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात येत असून कोस्टल गार्डच्या मदतीने बोटी सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे. फूड पॅकेट्स व इतर मेडिकल सहकार्य उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

महाडमधील पूरस्थिती गंभीर
मुसळधार पावसामुळे महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाडच्या सुकट गल्ली, भोईघाट परीसरात साडेतीन फूटांपर्यंत पाणी आहे. तर बाजारपेठेत तीन फुटांपेक्षा अधिक पाणी आहे. दस्तुरीनाका, क्रांतीस्तंभ, शिवाजी महाराज चौक परिसरदेखील जलमय झाला आहे. शहराजवळून वाहणार्‍या सावित्री आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यातच महाबळेश्‍वर येथे होत असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी सावित्री नदीतून घाटमाथ्यावरुन खाली कोकणात उतरत आहे.

कोविड सेंटरला पाण्याचा वेढा, ऑक्सिजनचा पुरवठा बंद
चिपळूणमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. चिपळूणमधील कोविड सेंटरला पाण्याचा वेढा पडला असून, ऑक्सिजन पुरवठा देखील बंद पडला आहे. त्यातच कोविड केंद्रातील 21 रुग्णांचा जीव धोक्यात आहे. चिपळूण पालिका आणि अपरांत रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने खेडेकर क्रीडा संकुल येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यात 21 रुग्ण आहेत. येथील ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आहे त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात आहे. सेंटरच्या बाहेर उभी असलेली रुग्णवाहिका वाहून गेली आहे.

COMMENTS