चित्रा वाघ यांनी अनुचित घटनांना वाचा फोडण्याचे काम केले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चित्रा वाघ यांनी अनुचित घटनांना वाचा फोडण्याचे काम केले

नगर -  भारतीय जनता पार्टीत नेहमीच चांगले काम करणार्‍यांना विविध पदांच्या माध्यमातून पाठबळ देण्याचे काम केले आहे. पक्षाच्या कार्यकर्ता हा सर्वसामान

भाजपने जनआक्रोश सभेत बायका नाचवल्या, त्याचे काय ?
राष्ट्रवादीचे आ.अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका LokNews24
उर्फी जावेद प्रकरणावरुन भाजपमध्येच चित्रा वाघ एकाकी ?

नगर – 

भारतीय जनता पार्टीत नेहमीच चांगले काम करणार्‍यांना विविध पदांच्या माध्यमातून पाठबळ देण्याचे काम केले आहे. पक्षाच्या कार्यकर्ता हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेत असतो. महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्षाच्या माध्यमातून राज्यातील अनेक अनुचित घटनांवर जोरदार प्रहार करुन वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर सत्य सर्वांसमोर आणून न्यायासाठी लढा देत आहेत. त्यांच्या या कार्याची भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन त्यांना आता राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिले आहे. या पदाच्या माध्यमातून आता देशपातळीवरही आपल्या कामाने वेगळा ठसा उमटवतील असा विश्वास आहे. नगर जिल्ह्यातील अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी लक्ष घालून संबंधितांना न्याय देण्याचे काम केले आहे. नगरमधील पक्ष कार्यकर्ते त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी  व्यक्त केला.

     भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाल्याबद्दल नगर शहर जिल्हा भाजपाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, सुनिल रामदासी, अ‍ॅड.विवेक नाईक, प्रा.भानुदास बेरड, विश्वनाथ कोरडे, सचिन पारखी, महेश नामदे, वसंत राठोड, ज्ञानेश्वर काळे, अन्वर खान, संतोष गांधी, अंजली वल्लाकट्टी, संगीता खरमाळे, सविता कोटा, वंदना पंडित, कुसूम शेलार, लिला अग्रवाल, सुमित बटुळे, शशांक कुलकर्णी, हुजेफा शेख, ऋग्वेद गंधे, वैभव झोटिंग आदि उपस्थित होते.

     सत्कारास उत्तर देतांना चित्रा वाघ म्हणाल्या, भारतीय जनता पार्टीने नेहमीच सर्वसामान्यांना न्याय देण्याची भुमिका बजावली आहे. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता रास्त मागण्यांसाठी जनतेच्या समवेत असतो. त्यामुळे आपणही कार्यकर्त्यांच्या बरोबरीने काम करुन, जनतेचे प्रश्न सोडवत आहोत. नगरमधील भाजपाचे कार्यकर्ते आपल्या पाठिशी असून, अनेक घटनांबाबत जागृत राहून काम करत आहेत, त्यामुळे प्रत्येकवेळी आपण नगरमध्ये या संबंधितांना न्याय देण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांसह केला आहे. आता राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची भाजपाने संधी दिली आहे, त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यास आपण प्राधान्य देऊ असे सांगितले.

     कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनिल रामदासी यांनी केले. तर आभार विवेक नाईक यांनी मानले.

COMMENTS