चाचण्या, शोध आणि उपचार हाच कोरोनावरचा उपाय ; देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चाचण्या, शोध आणि उपचार हाच कोरोनावरचा उपाय ; देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे.

दिल्लीत सासर्‍याने फोडले सुनेचे डोके
तेलीखूंटला घरफोडीत 41 हजाराची चोरी
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे निधन

मुंबई/प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येणार्‍या काळात कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे, असा सल्ला दिला. 

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी टाळेबंदी हा उपाय नसून ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यासंदर्भात फडणवीस यांनी ट्वीट केले आहे. अधिकाधिक 90 हजारांपर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस! चाचण्या वाढवा, तोच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या महाविकास आघाडी शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या एक लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पाहावी लागली, असे टीका करून त्यांनी म्हटले आहे, की कोरोना चाचण्या वाढविण्याचे सूत्र सांगितले आहे. गेल्या दहा दिवसांत सरासरी एक लाख 26 हजार 950 चाचण्या दररोज होत आहेत. असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा! येणार्‍या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय! दरम्यान, काल दिवसभरात राज्यात 36 हजार 902 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली, तर 17 हजार 19 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. 112 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. राज्यात आतापर्यंत 26 लाख 37 हजार 735 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 23 लाख 56 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 53 हजार 907 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात दोन लाख 82 हजार 451 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 87.2 टक्के इतका आहे.

COMMENTS