चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी

Homeमहाराष्ट्रसातारा

चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी

शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात मान्सून पाऊसाने सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार मुसंडी मारत आगमन केले आहे.

दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 1 लाख रूपये मदत करा
कोतुळमध्ये शिवदाहिनीवर चोरट्यांनी मारला डल्ला
बायको आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर | LOKNews24

शिराळा / प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात मान्सून पाऊसाने सोसाट्याच्या वार्‍यासह जोरदार मुसंडी मारत आगमन केले आहे. या परिसरात गेल्या चोविस तासात आतिवृष्टी झाली असून पाऊसाचा जोर कायम आहे. गेल्या चोविस तासांमध्ये चांदोली परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या 24 तासात 185 मि. मि. पाऊस पडला. तर या वर्षी एकूण पाऊस 282 मि. मि. पडला. सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिमेला 34.40 टीएमसी क्षमता असलेल्या चांदोली धरणामध्ये आज रोजी 15.12 टीएमसी पाणी साठा आहे. सध्या धरण 43.95 टक्के भरले आहे. संततधार पडणार्‍या पावसामुळे शिराळा तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. सध्याचा पाऊस भात शेतीस उपयुक्त ठरणारा आहे. ओढे नाले तुडूंब भरून वाहण्यास सुरवात झाली आहे. सतत पडणार्‍या पाऊसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 19 हजार क्युसेक्सने आवक झाली असून सध्या डाव्या कालव्याच्या दरवाजामधून नदीच्या पात्रात 1 हजार 523 क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.

वारणा नदीचा उगम असणार्‍या पाथरपुंज येथे गेल्या चोवीस तासांमध्ये 329 मि. मि. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. यामुळे चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे.

17-6

COMMENTS