नाशिक/प्रतिनिधी बनावट दारू निर्मिती प्रकरणातील सहा आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी रात्री ११ वा.पोलीस अधिक्षक
नाशिक/प्रतिनिधी
बनावट दारू निर्मिती प्रकरणातील सहा आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी रात्री ११ वा.पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी स्वतः विशेष पथकाचे नेतृत्व करून चांदोरी येथील एका लाॕन्समध्ये छापा टाकून बनावट दारू निर्मितीचा बेकायदेशीर कारखाना उध्वस्त केला होता.या कारवाईत एकूण एक कोटी पाच लाखाचा मुद्देमाल जप्त करून वाहनचालकासह तेरा आरोपींना ताब्यात घेतले होते.
यापैकी मुख्य संशयीत संजय मल्हारी दाते गोंडेगाव निफाड,लाॕन्समालक अंबादास खरात,चांदोरी,शुभम देवरे ,शिरूड धुळे,सुरेश देवरे धुळे ,दिपक पाटील देवपूर धुळे,पंकजकुमार मंडल आणि मणिकांतकुमार मंडल दोघेही बिहार या सहा आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.बाकी संशयीत अल्पवयीन असल्याने या टोळीच्या म्होरक्यांवर बालकामगार कायद्याअंतर्गत पुरवणी एफआयआर नोंदवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निफाड तालुक्यातील सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदोरी शिवारात असलेल्या उदय राजे लॉन्स मध्ये बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहीती पो.अधिक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती.स्थानिक पोलीसांना यासंदर्भात कुणकुण लागू न देता पो.अधिक्षकांनी सोमवारी रात्री ११ वा. स्थानिक गुन्हे शाखेतील दुय्यम अधिकाऱ्यांना सोबत घेत विशेष पथकाचे स्वतः नेतृत्व करून या लाॕन्सवर छापा टाकला.या ठिकाणी दारू निर्मितीसाठी असलेले एकूण नियोजन पाहील्यानंतर पो.अधिक्षकांसह पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना धक्का बसला.
एखाद्या अधिकृत कारखान्यातही नसेल अशी सारी व्यवस्था या बेकायदेशीर कारखान्यात पहायला मिळाली. लाॕन्समध्ये प्रवेश केल्यानंतर संजय मल्हारी दाते (४७, रा-गोंडेगाव ता. निफाड) हा पोलिसांच्या हाती लागला. बनावट देशी दारूचे अंदाजे १५०० ते २००० बॉक्स, अंदाजे १०,००० ते १५,००० देशी दारूच्या रिकाम्या बाटल्यासह अंदाजे 20 हजार लिटर स्पिरीट (200 लिटरचे 100 ड्रम), 10 हजार देशी दारूचे रिकामे खोके तसेच देशी दारूसाठी लागणारे इतर साहित्य, पाच पाण्याच्या टाक्या, एक ट्रक असा जवळपास एक कोटींचा ऐवज घटनास्थळावरून या पथकाने जप्त केला हा बनावट देशी दारूचा अवैध कारखाना अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीच्या उदयराजे लॉन्समध्ये सुरु होता.अशी माहीती या पथकाच्या तपासात निष्पन्न झाली आहे. या कारवाईत १३ संशयितांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लाॕन्सवर बेकायदेशीर दारू निर्मितीचा कारखाना उध्वस्त करण्याची कामगीरी पोलीस अधिक्षकांच्या कर्तव्यदक्षतेवर आणखी एक शिक्कामोर्तब करण्यास पुरक ठरल्याची चर्चा आहे.
*लोकमंथनची मालिका आणि छापा*
निफाड तालुक्यात दारूचा महापूर आल्याची वृत्त मालिका दै,लोकमंथनने सुरू केली होती.एव्हढी दारू येते कुठून? असा सवालही या मालिकेतून राज्य उत्पादन शुल्क विभागाला विचारला होता.निफाड सायखेडा पोलीसांच्या’ प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.या प्रश्नांची उत्तरे स्वतः पोलीस अधिक्षकांनी मैदानात उतरून केलेल्या कारवाईतून दिले आहेत.या कारवाईपासून सायखेडा पोलिसांना चार हात दूर ठेवण्याचे कारणही हेच असावे अशी तालुक्यात चर्चा आहे.
COMMENTS