नगर - सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय क्षेत्रात काम करतांना नि:स्वार्थपणे काम करुन सामाजिक उत्तरदायित्वच्या जाणिवेतून समाजऋण फेडण्यासाठी काम करणे हे
नगर –
सामाजिक, आध्यात्मिक, राजकीय क्षेत्रात काम करतांना नि:स्वार्थपणे काम करुन सामाजिक उत्तरदायित्वच्या जाणिवेतून समाजऋण फेडण्यासाठी काम करणे हे वाटतं तितकं सोप नाही. गेली 35 वर्षे वृत्तपत्र वितरणाबरोबरच पत्रकारितेचे व्रत समाजसेवा म्हणून पार पाडणारे विजय मते यांच्या चांगल्या कार्याचा सन्मान करणे हे साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले.
सावेडी उपनगरात गेली 35 वर्षांपासून वृत्तपत्र वितरणाबरोबरच सामाजिक, अध्यात्मिक, राजकीय क्षेत्रातील प्रश्नांना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करुन वृत्तपत्र क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल विजय मते यांचा 54 व्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक त्र्यंबके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक बबलू सूर्यवंशी, प्रतिष्ठानचे सचिव योगेश पिंपळे, बापुसाहेब भोसले, अकबर पटेल, सागर मेट्टू, आकाश त्र्यंबके, गणेश वाघमोडे अदिंसह सदस्य उपस्थित होते.यावेळी बबलू सूर्यवंशी, योगेश पिंपळे यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्कारस उत्तर देतांना श्री. मते म्हणाले, चांगले काम करणार्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. कुठे काही चुकत असते तर त्यांच्या विरोधात लिहिणे मी कर्तव्य समजून प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून चांगले काम या भागात होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले.
COMMENTS