Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रपूर गोळीबाराच्या घटनेने हादरले

चंद्रपूर : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांत सातत्याने वाढ होत असतांना चंद्रपूर जिल्ह्या देखील रविवारी गोळीबाराच्या घटनेने हादरला आहे. सकाळी सकाळी बल

इस्लामपूरातील प्रभाग 11 मध्ये काट्याच्या लढती…?
निगडीत पाच बांगलादेशी नागरिकांना अटक
न्यायाधीशपदी निवड झालेबद्दल सचिन साळुंखे यांचा सत्कार

चंद्रपूर : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांत सातत्याने वाढ होत असतांना चंद्रपूर जिल्ह्या देखील रविवारी गोळीबाराच्या घटनेने हादरला आहे. सकाळी सकाळी बल्लारपूर शहरातील मालू कापड दुकानात गोळीबार करण्यात आला. सोबतच पेट्रोल बॉम्ब फोडून दहशत निर्माण करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला.
गोळीबाराच्या या घटनेत दुकानातील कार्तिक साखरकर हा 32 वर्षीय कामगार जखमी झाला. तर या कामगाराच्या पायाला गोळी लागली असून त्याला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेतील आरोपी सध्या गजाआड होण्याआधीच आज बल्लारपूर शहरातील गांधी चौकात असलेल्या मालू कापड दुकानात पेट्रोल बॉम्ब टाकून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराच्या घटनेने पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्हा हादरला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS