चंद्रकांत पाटीलच प्रदेशाध्यक्ष राहणार :फडणवीस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रकांत पाटीलच प्रदेशाध्यक्ष राहणार :फडणवीस

पुणे : भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्याक

नगरची भाजप बांधली राष्ट्रवादीच्या दावणीला? ;प्रदेशाध्यक्ष पाटील आज दखल घेण्याची शक्यता
प्रदेशाध्यक्षांसमोरच उघड झाली शहराध्यक्षांवरील नाराजी
सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, कायद्याचे उल्लंघन करू नका – चंद्रकांत पाटील

पुणे : भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले जाण्याची चर्चा आहे. पुणे दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र स्पष्ट शब्दांत ही चर्चा फेटाळून लावली आहे. पुढील वर्षी महाराष्ट्रात मुंबईसह इतर अनेक महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने भाजप तयारीला लागला आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी मनसेसोबत युतीचीही चाचपणी केली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये देखील बदलांची चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे नुकतेच दिल्लीला जाऊन परतले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठकही झाल्याचंही बोलले जात आहे. त्यानंतर चंद्रकांत पाटील व आशिष शेलार हे देखील दिल्लीत पोहोचले आहेत. अचानक झालेल्या या दौऱ्यामुळं पडद्यामागे काही तरी घडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटलांच्या गच्छंतीचीही चर्चा आहे. फडणवीस यांनी आज याबाबत सविस्तर खुलासा केला.

COMMENTS