चंद्रकांत पाटलांमुळे राज्याचं मनोरंजन होतंय… त्यांच्यावर करमणूक कर लावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांमुळे राज्याचं मनोरंजन होतंय… त्यांच्यावर करमणूक कर लावा

प्रतिनिधी : मुंबईरुपाली चाकणकर या ट्विटमध्ये म्हणाल्या की , चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्य

विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाला गती द्यावी
फडणवीसांचं वय पाहू नका… १०० अजित पवार ते खिशात घालून फिरतात…
चंद्रकांत पाटील यांचा पुन्हा जाहीर माफीनामा

प्रतिनिधी : मुंबई
रुपाली चाकणकर या ट्विटमध्ये म्हणाल्या की , चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्याला निखळ मनोरंजन होत आहे.

महाराष्ट्राचे वित्तमंत्री म्हणून अजित दादांना माझी विनंती आहे की त्यांनी चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा. केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे देत नाही निदान यांच्यावरील करमणूक करामुळे सरकारचा काही भार तरी हलका होईल, असे ट्विट करत रुपाली चाकणकरांनी पाटील यांना धारेवर धरले .

‘देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दबंग नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना (Ajit Pawar) खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’,

असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले होते . यावरून राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे .

COMMENTS