घरकुल आवास योजनेअंतर्गत ८० घरकुलांना मंजूरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरकुल आवास योजनेअंतर्गत ८० घरकुलांना मंजूरी

भाळवणी (प्रतिनिधी):-  पारनेर तालुक्यातील माळकूप येथे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत शबरी घरकुल आवास योजनेसंदर्भात

शासनाच्या पेन्शन समिती आदेशाची केली होळी…
सहकारमहर्षी नागवडे कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन उत्साहात
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये विविध उपक्रम

भाळवणी (प्रतिनिधी):- 

पारनेर तालुक्यातील माळकूप येथे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या अधिकार्‍यांच्या प्रमुख उपस्थितीत शबरी घरकुल आवास योजनेसंदर्भात तसेच इतर विषयावर बैठक नुकतीच येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात पार पाडली. आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच संजय काळे यांच्या विशेष प्रयत्नातून येथील अनुसूचित जाती – जमातीच्या ८० घरकुलांची मंजूरी मिळाली असल्याची माहिती सरपंच काळे यांनी दिली. 

लाभार्थ्यांना ग्रामपंचायत मार्फत जागा दिली जाणार असून लाभार्थ्यांची कागदपत्रे पुर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचे सरपंच काळे यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी घरकुल आवास योजनेसंदर्भात मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी पारनेरचे गटविकास अधिकारी किशोर माने, श्री. सातपुते, सरपंच संजय काळे, उपसरपंच राहुल घंगाळे, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, चेअरमन कृष्णाजी शिंदे, मंजाबापू शिंदे, बबन शिंदे, लहू गांगुर्डे, सखाराम नाबगे, रंगनाथ गांगुर्डे, आबा काळे, संदिप काळे, कुंडलिक नाबगे, संतोष ठाणगे, सदाशिव शिंदे, विलास लांडे, विकास माळी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS