गोदापात्रात उडी मारून शिक्षकाची आत्महत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदापात्रात उडी मारून शिक्षकाची आत्महत्या

पूर्णा- पूर्णा तालुक्यातील माटेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने गोदावरी नदीवरील पुलावरून गोदावरी नदीच्या पात्रामध्ये उडी मार

चक्क मित्रानेच केली मित्राच्या घरी चोरी
विनयभंगाच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही घरांना तेजी कायम

पूर्णा- पूर्णा तालुक्यातील माटेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने गोदावरी नदीवरील पुलावरून गोदावरी नदीच्या पात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. 27) घडली असून तब्बल तीन दिवसानंतर या शिक्षकाचा मृतदेह 29 ऑगस्ट रोजी मिळून आला.
मूळ बरबडी गुरव (ता.पालम जि. परभणी) येथील रहिवासी तथा तालुक्यातील माटेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये सहशिक्षक म्हणून नेमणुकीस असलेले सचिन हनुमंतराव ठाकुर (वय 40 वर्षे) या शिक्षकाने शुक्रवारी सायंकाळी गावाकडे जात असताना सारंगी शिवारातील गोदावरीच्या पुलावरून नदीच्या पात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केली. तब्बल दोन दिवस या शिक्षकाचा मृतदेह आढळून आला नाही. अखेर दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या दरम्यान या शिक्षकाचा मृतदेह गोदावरी नदीमध्ये तरंगताना आढळून आला असून याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

COMMENTS