गृहमंत्री अमित शाह   बेपत्ता असल्याची तक्रार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गृहमंत्री अमित शाह बेपत्ता असल्याची तक्रार

’नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडिया’ (एनएसयूआय) संघटनेचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बेपत्ता असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांत दाखल केली

वायुसेनेचे मिराज-2000 कोसळले, पायलट सुरक्षित
पोतलेत स्वयंभू मारूती मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला
मुखेड शहरात घाणीचे साम्राज्य,पाण्यासाठीही पायपीट, प्रशासनाचे दुर्लक्ष

नवी दिल्ली : ’नॅशनल स्टुडंटस युनियन ऑफ इंडिया’ (एनएसयूआय) संघटनेचे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बेपत्ता असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांत दाखल केली आहे. अशा संकट प्रसंगी पळून न जाता देशवासीयांची काळजी घेणे आणि सेवा करणे हे राजकीय व्यक्तीचे काम असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 

    शाह बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिस करियप्पा यांची चौकशी करण्यासाठी आल्याचा दावा एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते लोकेश चूग यांनी केला. 2013 पर्यंत राजकीय नेते नागरिकांना उत्तरासाठी बाध्य होते; परंतु भाजप सत्तेत आल्यानंतर मात्र हे चित्र पालटले. महामारीसारख्या कठीण काळात पंतप्रधानपदानंतर दुसर्‍या अतिशय महत्त्वाच्या पदावर असलेली व्यक्ती मात्र गायब झाली आहे, असेही चुग यांनी म्हटले. देशातील सर्वच जण अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत. अशा काळात नागरिकांना आधार देणे आणि जबाबदारी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे; परंतु सद्य सरकार मात्र यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे ’एएसयूआय’ने गृहमंत्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. सरकार देशाच्या प्रश्‍नांची उत्तरे लवकरात लवकर देईल, अशी आशा आहे, असेही ’एनएसयूआय’ने आपल्या निवेदनात म्हटले.

COMMENTS