गुरमीत राम रहीम सिंह अखेर दोषी… न्यायालय सुनावणार शिक्षा

Homeताज्या बातम्यादेश

गुरमीत राम रहीम सिंह अखेर दोषी… न्यायालय सुनावणार शिक्षा

पंचकुला : वृत्तसंस्था या आठवड्याच्या सुरुवातीला, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने गुरमीत राम रहीम सिंग यांच्याविरोधातील खुनाचा खटला  पंच

पुण्यात जनावरांचे मृतदेह विद्युत दाहिनीत करणार दहन
चांगला अभ्यास करत कुटूंबाचे नाव लौकिक करावे
शांततापूर्ण सहअस्तित्वानेच जगाची भरभराट !

पंचकुला : वृत्तसंस्था

या आठवड्याच्या सुरुवातीला, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने गुरमीत राम रहीम सिंग यांच्याविरोधातील खुनाचा खटला 

पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयातून इतर कोणत्याही सीबीआय न्यायालयात हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. 

आता पंचकुलाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने गुरमीत राम रहीम सिंग आणि इतर पाच आरोपींना कलम ३०२ अंतर्गत हत्येचे दोषी ठरवले आहे. १२ ऑक्टोबरला शिक्षा सुनावली जाणार आहे.

गुरमीत राम रहीम सिंह सध्या हरियाणामधल्या रोहतक जिल्ह्यातील सुनारिया जेलमध्ये आहे. दोन साध्वींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुरुमीत राम रहिमला २०१८ साली २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह (Gurmeet Ram Rahim)सह  पाच आरोपींना रणजीत सिंह(Ranjeet Singh) याच्या हत्येच्या आरोपात पंचकुला न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

रणजीत सिंह गुरमीत राम रहीमचा समर्थक होता. १० जुलै २००२ रोजी त्याची हत्या झाली. याप्रकरणी रणजीत सिंहचा मुलगा जगसीर सिंह याने न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीबीआयने ३ डिसेंबर २००३ रोजी या हत्या प्रकरणात एफआयआर नोंदवला होता.

COMMENTS