गुप्तधनाच्या लालसेपोटी जादुटोना करुन नरबळीसारखा प्रकार केल्याच्या संशयावरुन तिघाना अटक करण्यात आली आहे. जाफ्राबाद येथील डोणगावमध्ये ही घटना घडली आहे.
गुप्तधनाच्या लालसेपोटी जादुटोना करुन नरबळीसारखा प्रकार केल्याच्या संशयावरुन तिघाना अटक करण्यात आली आहे. जाफ्राबाद येथील डोणगावमध्ये ही घटना घडली आहे. याबाबत सिमा संतोष पिंपळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पति संतोष याच्यासह जिवन पिंपळे व देऊळगाव राजा येथील एका अनोळखी महिलेच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिमा पिंपळे या दोन मुले, दोन मुली व सासु सासऱ्यासह राहतात. त्यांच्या पतिला गुप्त धन काढण्याचा नाद लागला होता. तो रात्री अपरात्री गावातील गढी, स्मशानभुमी येथे जावुन फिरायचा. मला गुप्तधन सापडेल तेव्हा तुम्हाला दाखवुन देईल असे म्हणत दारु पिवुन पत्नी व मुलाना त्रास देत होता. 22 सप्टेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास संतोष याच्यासोबत जिवन पिंपळे व देऊळगाव राजा येथील
एक महिला असे तिघेजण त्यांच्या घरी आले. सिमा मुलगा प्रमेश्वर व मुलगी अश्वीनी सोबत जेवण करत होते. त्यावेळी त्या महिलेने मुलाच्या डोक्यावर हात व मुलीच्या पायावर हात ठेवुन घरातील लाकडी खांबाला काही तरी धरबंधन केले. गुप्त धनाचा उजेड पडला, मला सगळ दिसतय, असे म्हणत ती महिला घराबाहेर निघुन गेली. 23 सप्टेंबर रोजी रात्री संतोष याने पत्नी सिमाला पौर्णीमा होवुन दोन दिवस झाले आहेत. मला तुझा गुप्त धनासाठी बळी दयावा लागेल, असे म्हणत घरातील अगरबत्त्या, हळदी- कुंकु काढुन ते सीमाच्या अंगाला लावले. पत्नीने विरोध केल्यावर त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. त्यावेळी शेजाऱ्यांनी त्यांचे भांडण सोडवले. त्यानंतर सीमाने पोलिसांत तक्रार दिली असून, तिन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे.
COMMENTS