गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पुणे पॅटर्न उपयुक्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पुणे पॅटर्न उपयुक्त

संघटित गुन्हेगारीचे जाळे उखडून टाकण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार

राज्यातील सत्तासंघर्ष पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
साताऱ्यात उदयनराजे भोसले आघाडीवर
Vasai : वसईच्या मधुबन परिसरात 2 हजारांच्या नोटांचा पाऊस (Video)

पुणे/प्रतिनिधीः संघटित गुन्हेगारीचे जाळे उखडून टाकण्यासाठी राज्य सरकारने तयार केलेला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) शहरात पुणे पोलिसांनी अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर यापूर्वीच कारवाई केली आहे. बहुतांश टोळ्यांवर प्रभावीपणे मोक्का लावल्यामुळे संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडले आहे. याचप्रमाणे अगामी काळात लोणी काळभोर व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहावा याकरिता पुणे पॅटर्न राबवून मोक्का अंतर्गत शिक्षा होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.  

लोणी काळभोर व लोणीकंद ही ग्रामीण भागातील पोलिस ठाणी शहर पोलिस आयुक्तालयास जोडण्यात आली आहेत. या पार्श्‍वभूमीवर लोणी काळभोर पोलिस ठाण्यच्या हद्दीची पाहणी करण्यासाठी गुप्ता आले होते. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. गुप्ता म्हणाले, की बेकायदेशीर सावकारीच्या समूळ उच्चाटनासाठी महाराष्ट्र शासनाने दमदार पावले टाकली असून बेकायदेशीर सावकारांना पायबंध घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अध्यादेश हा कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे. या कायद्याच्या तरतुदीनुसार विनापरवाना सावकारी करणार्‍यास कडक शिक्षेची तरतूद केलेली असून आगामी काळामध्ये ग्रामीण भागात बेकायदा खासगी सावकारकी करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल. गरज पडली तर तडीपार व मोक्का यांसारख्या गुन्ह्यांची नोंद केली जाईल. यांचबरोबर दारू, मटका, जुगार तसेच वाळूमाफियांसमवेत इतर अवैध धंदे करणार्‍यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल. 

पुणे-सोलापूर व पुणे-नगर या दोन्ही महामार्गावरील वाढती वाहतूक त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येसाठी कायदा, सुव्यवस्था सांभाळणे यांस आम्ही प्राधान्य देणार आहोत. गुन्हेगारी कमी करायची असेल तर लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे; पण लोक तेव्हाच तक्रार करायला पुढे येतात, जेव्हा त्यांना खात्री असते, की पोलिस कारवाई करतील. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्या अनुषंगाने गुन्हे व इतर प्रशासकीय माहिती घेऊन लवकरात लवकर या दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीत कशाप्रकारे प्रभावीपणे काम करता येईल, यासाठी अधिक मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे गस्त वाढवून गरजेच्या वेळी तात्काळ मदत मिळेल याकरिता आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, अशी ग्वाही गुप्ता यांनी दिली.

COMMENTS