गुंडाला मदत; माजी खासदार काकडे आत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुंडाला मदत; माजी खासदार काकडे आत

तळोजा तुरुंगातून सुटलेल्या गुंड गजानन मारणे याची भव्य मिरवणूक काढण्याच्या नियोजनात सहभाग घेऊन गुन्हेगारांना मदत केल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने आज अटक केली, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

आई वडिलांनी मुलीला फेकून दिले नाल्यात
व्यावसायिक गॅस पुन्हा 100 रुपयांनी महागला
विदर्भात होणार चित्रपटनगरी..? संजय दत्त नितीन गडकरींच्या भेटीला…

पुणे/प्रतिनिधी: तळोजा तुरुंगातून सुटलेल्या गुंड गजानन मारणे याची भव्य मिरवणूक काढण्याच्या नियोजनात सहभाग घेऊन गुन्हेगारांना मदत केल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने आज अटक केली, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर सुमारे 300 आलिशान गाड्यासह मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवर भव्य मिरवणूक काढून महाराष्ट्राचा किंग कोण अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. एक प्रकारे त्याने सर्व पोलिस दलालाच आव्हान दिले होते. त्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलिस दलाने त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल केले. पुणे ग्रामीण पोलिसांनी मारणे याच्याविरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश मिळवून त्याला सातारा जिल्ह्यातील मेढा येथे 2 मार्च रोजी अटक केली. शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्तांनी सर्व बड्या गँगस्टारांवर कारवाई सुरू केली आहे. मोक्का, तडीपारी, स्थानबद्धता अशा विविध मार्गाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. आता या गँगस्टरांना मदत करणार्‍या व त्यांच्यासाठी मध्यस्थी करणार्‍यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्या अनुषंगाने काकडे यांना आज पोलिस आयुक्तालयात बोलविण्यात आले होते. गेल्या महिन्यात पोलिस आयुक्तालयात दुपारी अनेक आलिशान गाड्या आल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. काकडे यांना बराच वेळ बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. या चौकशीतून पोलिसांनी त्यांना योग्य तो इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे. शहरातील संघटित गुन्हेगार टोळ्यांना आश्रय देणार्‍या तसेच त्यांना मदत करणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. मारणे याच्यासहीत शहरातील सर्व प्रमुख गुन्हेगार व त्यांच्या टोळ्यांवर मोक्का तसेच एमपीडीए अ‍ॅक्टनुसार कारवाई करून त्यांना तुरुंगात धाडण्यात आले आहे. 

COMMENTS