गलवानच्या 20 शहीदांना वीरता पुरस्कार जाहीर

Homeताज्या बातम्यादेश

गलवानच्या 20 शहीदांना वीरता पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्ताने 1380 पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये 'इंडो-तिब्बत सीमा पोलिस' अर्थात आयटीब

नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयात डेंग्यू संदर्भात आढावा बैठक संपन्न
लग्नाळू पोरांना फसवणारी टोळी गजाआड | LOK News 24
डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

नवी दिल्ली : भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य सोहळ्याच्या निमित्ताने 1380 पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘इंडो-तिब्बत सीमा पोलिस’ अर्थात आयटीबीपीच्या 23 जवानांना स्वातंत्र्य दिनी वीरता पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये लद्दाखच्या गलवान खोऱ्यात गेल्या वर्षी चीनशी झालेल्या संघर्षात हौतात्म्य पत्करणाऱ्या 20 जवानांचा समावेश आहे. आयटीबीपीने यांची माहिती दिली.
आयटीबीपीने सांगितले की सीमेवरील संघर्ष आणि सुरक्षा कर्तव्यांसाठी जवानांना आतापर्यंत दिले गेलेले हे सर्वाधिक वीरता पदक आहेत. दर वर्षी स्वातंत्र्य दिनी देशाची सेवा आणि बलिदानासाठी वीरता पुरस्काराची घोषणा केली जाते. भारत-चीन सीमेवर गेल्या वर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यातील वेगवान प्रवाहाच्या नदीमध्ये भारतीय सैनिकांवर चीनने भ्याड हल्ला केला होता. यावेळी भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांचा वार माघारी परतवून लावताना चिनी सैनिकांचे मोठे नुकसान केले होते. या संघर्षात 40 हून अधिक सैनिक ठार झाले होते.
गलवान नदीचा वेगवान प्रवाह आणि त्यात चीनी सैनिकांनी केलेला पाठीत वार या परिस्थितीतही भारतीय जवानांनी शौर्य गाजवले होते. शस्त्रास्त्रांचा वापर न करता चिनी सैनिकांसोबत या जवानांनी तब्बल 17 ते 20 तास लढाई केली. चीनी सैनिकांनी दगड, लोखंडी काटेरी जाळ्या असलेले रॉड आदींनी हल्ला केला होता. रक्तबंबाळ झाले तरही या जवानांनी चिनी सैनिकांना चोख प्रत्यूत्तर दिले. या झटापटीत आपले 20 जवान शहीद झाले होते.

एकूण 1380 पदके जाहीर
यावेळी 1380 पदके दिली जाणार आहेत. यामध्ये वीरतेसाठी राष्ट्रपतींचे 2 पोलीस पदक, वीरतेसाठी 628 पोलीस पदक, विशिष्ट सेवेसाठी 88 राष्ट्रपती पोलीस पदक आणि उत्कृष्ट सेवेसाठी 662 पोलीस पदक देण्यात येणार आहेत. 628 पोलीस पदकांपैकी जम्मू-कश्मीर 256, सीआरपीएफला 151, आयटीबीपीला 23 वीरता पुरस्कार दिले जाणार आहेतय याशिवाय ओडिशा पोलीस 67, महाराष्ट्र पोलीस 25 आणि छत्तीसगड पोलिसांना 20 पुरस्कार दिले जाणार आहेत.

COMMENTS