गर्दी होण्याचा दोष अजित पवारांचा नाहीः चंद्रकांतदादा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गर्दी होण्याचा दोष अजित पवारांचा नाहीः चंद्रकांतदादा

भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमालाही गर्दी होण्याच्या शक्यतेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बचावात्मक भूमिका घेतली.

लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक कधी ?
१० वी १२ वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग, संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक | DAINIK LOKMNTHAN
राज्यात शनिवार, रविवारी लॉकडाऊन

पुणे/प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमालाही गर्दी होण्याच्या शक्यतेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बचावात्मक भूमिका घेतली. कार्यक्रमांना गर्दी होत असेल तर नेत्यांचा काही दोष नाही. प्रत्येक वेळी टीका करायला पाहिजे असे नाही. संयोजकांनी काळजी घेतली पाहिजे. लोकांनी तारतम्य बाळगले पाहिजे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, की संयोजकांनी कार्यक्रम ऑनलाईन दाखवले तर गर्दी होणार नाही. पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या अनुयायांनी अडचणीत आणू नये. गर्दीचे खापर त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांवर फोडले. राजकीय परिणामांची काळजी न करताही उद्धव ठाकरे यांना आपण अजूनही हिंदुत्ववादी आहोत असे वाटते याचे मला विशेष वाटते; पण अठरा महिन्यात हिंदुत्वापासून कसे बाजूला गेलात, महाशिवआघाडीची महाविकास आघाडी कशी झाली, असा सवाल त्यांनी ठाकरे यांना केला. दरम्यान, नागरिकांनो गर्दी करू नका, अशी सतत तंबी देणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गर्दी झालेल्या सभेला संबोधित करण्याची वेळ शनिवारी आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात सुरक्षित वावराचा फज्जा उडाला. ’कार्यकर्त्यांनी आणि पदाधिर्‍यांनी उत्साहापोटी नियमावलीचे पालन केले नाही, ही खंत माझ्या मनात आहे,’ अशी मखलाशी पवार यांनी केली होती; पण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यावर मांडव टाकून सार्वजनिक सभा घेतलीच क

COMMENTS