गरीब लोकांच्या घरावर फिरवला बुलडोझरः राऊत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गरीब लोकांच्या घरावर फिरवला बुलडोझरः राऊत

’आंबील ओढा येथील झोपडपट्टीवर भर पावसात कारवाई करण्यामागे पुणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे हितसंबंध आहेत,’ अशी टीका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ’पुनर्वसनाचे काम पावसात करायचे नसते, तरी गरीब लोकांच्या घरावर बुलडोझर का फिरवला,’ असा सवालही त्यांनी

विद्यार्थ्यांचे कोविड काळातील शैक्षणिक नुकसान भरून काढा
मानवलोक समाजकार्य महाविद्यालयात अँटी रॅगिंग दिवस  साजरा
उष्माघाताने नव्हे चेंगराचेंगरीमुळे मृत्यू – नाना पटोले

पुणे / प्रतिनिधी: ’आंबील ओढा येथील झोपडपट्टीवर भर पावसात कारवाई करण्यामागे पुणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे हितसंबंध आहेत,’ अशी टीका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ’पुनर्वसनाचे काम पावसात करायचे नसते, तरी गरीब लोकांच्या घरावर बुलडोझर का फिरवला,’ असा सवालही त्यांनी केला. 

’कोरोना काळात लोकांना रोजगार नसताना घरे पाडून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यात आले. महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा एकही पदाधिकारी कारवाई रोखण्यासाठी गेला नाही. या घटनेला सत्ताधारी आणि त्यांचे प्रशासन जबाबदार असून पुणे महापालिका आणि सरकारने संबंधितांवर कारवाई करावी,’ अशी मागणी राऊत यांनी केली. ’कोणाच्या मर्जीने बिल्डरने लोकांच्या सह्या घेतल्या,’ असा सवालही त्यांनी केला. राऊत यांनी आंबील ओढा झोपडपट्टी येथील अतिक्रमण विरोधी कारवाईत नुकसान झालेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आंबील ओढा परिसरातील रहिवाशांची घरे तोडण्याची जी कारवाई करण्यात आली, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही राऊत यांनी या वेळी केली. दलितांवरील अन्याय कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

COMMENTS