गटारीच्या निकृष्ट कामा बाबत अधिकारी व ठेकेदारांवर त्वरीत गुन्हा दाखल करा – दत्ता काले

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

गटारीच्या निकृष्ट कामा बाबत अधिकारी व ठेकेदारांवर त्वरीत गुन्हा दाखल करा – दत्ता काले

कोपरगाव नगरपालिका प्रशासना मार्फत कोपरगाव शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकालगत भुयारी गटारीचे नवीन बांधकाम करण्यासाठी नगरपरिषदेने सोळा लाखाची तरतुद करुन भुयारी गटारीचे काम पूर्ण करुन रस्ता खुले होताच काही दिवसात सदर कामाला तडे गेल्याने हे कामकाज निकृष्ट दर्जाचे चित्र जनतेसमोर आले आहे.

पावसाअभावी शेतकरी हतबल
वीजचोरी प्रकरणी दोन वर्षाचा तुरुंगवास; अहमदनगर न्यायालयाचा निकाल
दोन रुपयांसाठी अंध भिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला’ | LokNews24

कोपरगाव  शहर प्रतिनिधी- कोपरगाव नगरपालिका प्रशासना मार्फत कोपरगाव शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकालगत भुयारी गटारीचे नवीन बांधकाम करण्यासाठी नगरपरिषदेने सोळा लाखाची तरतुद करुन भुयारी गटारीचे काम पूर्ण करुन रस्ता खुले होताच काही दिवसात सदर कामाला तडे गेल्याने हे कामकाज निकृष्ट दर्जाचे चित्र जनतेसमोर आले आहे. यास नगपरिषदेचे बांधकाम विभागातील अधिकारी व ठेकेदार जबाबदार आहेत यांच्यावर त्वरीत गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी कोपरगांव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदनाव्दारे  मागणी केली आहे. 

    पावसाळ्यामुळे शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पावसाचे पाणी नेहमी साचत असून नागरिकांना अनेक अडचणींला सामोरे जावे लागत होते सदर भुयारी गटारीचे काम सुरु करावी अषी मागणी देखील अनेकवेळा नागरिकांनी पालिकेला केली होती या मागणीनुसार नगरपरिषदेने भुयारी गटारीसाठी १६ लाखाची मंजुरी दिली होती. कामकाज करतांना धर्मवीर संभाजी महाराज सर्कल ते भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक धारणगाव रस्ता पुर्णपणे दिड ते दोन महिने बंद ठेवला.

पालिकेने दिलेल्या सुचनेनुसार ठेकेदाराने कामकाज सुरु केले. भुयारी गटारीचे कामकाज निकृष्ट दर्जाचे सुरु असल्याचे अनेक तक्रारी परिसरातील व्यापारी, नागरिकांनी पालिकेला कळवुन देखील पालिका प्रषासनाने सदर विषयाकडे डोळेझाक केली. झालेल्या भुयारी गटारीचे काम पूर्ण झाल्यावर सदरचा रस्ते खुला करण्यात आला व अवघ्या काही दिवसांतच भुयारी गटारीच्या बांधकामाला तडे गेले.  हे मिडीयाने निदर्शनास आणुन देताच पालिका प्रशासनाचे डोळे उघडे.

पालिकेने ठेकेदाराला या विषयातुन बाहेर काढण्यासाठी सदरचा रस्ता तोडुन रस्त्याला डांबरीकरणाचे आडवे पट्टे मारले यात काॅंक्रीटीकरण व डांबरीकरण हे एकत्र आल्यावर टिकणार नाही याची खात्री असतांना देखील केवळ ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम नगरपरिषद करत आहे. सदर ठेकेदारासह पालिका विभागातील संबंधित अधिकारी यांच्यावर निकृष्ट दर्जाचे काम केले या बाबत गुन्हा दाखल करा अन्यथा अंदोलन करण्यात येईल अषी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनप्रसंगी केली आहे. निवेदनप्रसंगी अविनाश पाठक, जयेश बडवे, गोपी गायकवाड, खालीकभाई कुरेशी आदि उपस्थित होते.

COMMENTS