Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? : वंचितचे नेते अ‍ॅड. आंबेडकरांचे वक्तव्य  

मुंबई : अवघ्या काही दिवसांपूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांनी बारामतीत दिलेली भेट आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी गौतम अदानी यांना आपले भाऊ असल्याचे

आठ लेखकांचा ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’मधून माघार
गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
खा. शरद पवारांनी पुन्हा केले गौतम अदानींचे कौतुक
Prakash Ambedkar

मुंबई : अवघ्या काही दिवसांपूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांनी बारामतीत दिलेली भेट आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी गौतम अदानी यांना आपले भाऊ असल्याचे केलेले वक्तव्य बघता खा. शरद पवारांची राष्ट्रवादी काँगे्रस केंद्रात सत्तेत जाण्याच्या चर्चा सुरू असतांनाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या एका विधानाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
खा. सुप्रिया सुळे लवकरच केंद्र सरकारमध्ये मंत्री होतील, असे थेट भाकीत करत आंबेडकर यांनी शरद पवारांकडून ‘धक्कातंत्र’ वापरले जाण्याचे संकेत दिले. त्यामुळे महापालिका निवडणुकांपुरती मर्यादित असलेली चर्चा थेट राष्ट्रीय राजकारणाच्या पातळीवर पोहोचली आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत असून, राज्यातील डझनभराहून अधिक महानगरपालिकांमध्ये महायुती कोलमडल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना थेट एकमेकांविरोधात उभ्या ठाकणार आहेत. दुसरीकडे, पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीतील युती अधिकृतरीत्या तुटल्याची घोषणा झाली आहे. जागावाटपावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे ही युती फिस्कटल्याचे स्पष्ट करत प्रकाश आंबेडकर यांनी वंचितला स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. ‘पुण्यातील पाटीलकीमुळे आमचे आणि काँग्रेसचे पटले नाही,’ असे स्पष्ट शब्दांत सांगत आंबेडकर यांनी आपली भूमिका मांडली. या निर्णयामुळे पुण्याच्या राजकारणात नवी समीकरणे आकाराला येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. युती तुटल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर यांनी केवळ स्थानिक राजकारणापुरतेच भाष्य न करता थेट केंद्रातील सत्ताकारणावर भाष्य करत राजकीय वर्तुळात ‘बॉम्ब’ टाकला. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळेल, असा दावा करत त्यांनी चर्चांना वेग दिला. ‘मुंबईत आमची आणि काँग्रेसची युती असल्याने कोणी नाराज होत असेल, तर त्याची आम्हाला पर्वा नाही. आमच्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे, व्यक्ती नव्हे,’ असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले. या विधानांमुळे शरद पवार कोणता मोठा राजकीय निर्णय घेणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय असेल, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यास राज्यातील आणि राष्ट्रीय पातळीवरील सत्तासमीकरणांवर त्याचे दूरगामी परिणाम होतील, असे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे.

अदानींच्या मध्यस्थीने शरद पवार एनडीएमध्ये? ः वडेट्टीवारांचा दावा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीदेखील असेच वक्तव्य करून चर्चाला हवा दिली आहे. उद्योगपती गौतम अदानी अलीकडेच बारामतीला भेट देऊन गेले असल्याचा उल्लेख करत, त्यांच्या मध्यस्थीने शरद पवार लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सहभागी होऊ शकतात, असा दावा वडेट्टीवार यांनी केला. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना खासदारांची संख्या वाढवण्याची गरज असून, दुसरीकडे शरद पवार यांच्याकडे मर्यादित आमदारसंख्या आहे. त्यामुळे दोघांचे हितसंबंध एकमेकांशी जुळत असल्याचे त्यांनी नमूद केले. पुण्यातील राजकीय घडामोडी आणि संभाव्य एकत्र येणे ही या मोठ्या बदलाची पहिली पायरी ठरू शकते, असे सूचक विधानही त्यांनी केले.

COMMENTS