खा. विखेंनी ‘अर्बन’ ची निवडणुक टाळण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावावी- सुधीर मेहता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. विखेंनी ‘अर्बन’ ची निवडणुक टाळण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावावी- सुधीर मेहता

नगर -  ज्या कामासाठी अर्बन वर रिझर्व बँकेने प्रशासक आणला होता ती कारवाइ पुर्ण होण्या आधीच प्रशासकाला मागे बोलाउन निवडणूक लादण्याची घाइ म्हणजे बँके

‘ऑक्सिजन पार्क’मधील ऑक्सिजन गायब… नागरिक आंदोलनाच्या तयारीत
विद्यार्थ्यांना होणार मोफत शालेय साहित्य वाटप
महसूल प्रशासनाकडून डिजीटल सात बाराचे घरपोच वाटप

नगर – 

ज्या कामासाठी अर्बन वर रिझर्व बँकेने प्रशासक आणला होता ती कारवाइ पुर्ण होण्या आधीच प्रशासकाला मागे बोलाउन निवडणूक लादण्याची घाइ म्हणजे बँकेची अवस्था आगीतुन फुफाट्यात अशीच होणार अस्ल्याने खासदार सुजय विखे यानी आपली सर्व शक्ती पणाला लाउन ही निवडणूक थांबवावी अशीे आग्रही मागणी नवनीत विचार मंचचे प्रमुख सुधीर मेहता यानी केली आहे.

     कोट्यावधींची थकलेली कर्जे आणि वाढलेला एनपीए बँकेत झालेले घोटाळे यासाठी प्रशासक आणल्याचे सांगितले जात होते, मग हा उद्देश पूर्ण होण्याआधीच  निवडणूक जाहीर  करण्याने रिझर्व बँकेचा उद्देश पूर्ण होणार आहे का?  हजारो कर्मचारी ठेविदार कर्जदार आणी व्यापारी यांचे जीवनच बँकेवर अवलंबुन असताना  प्रशासकच ही परिस्थिती नियंत्रणात आणु शकतात.

     आम्ही निवडणुकीला घाबरत नाही, निवडणूक लढणे, नवे संचालक येतील, मागील 20-25 वर्षांचा अनुभव पाहता सर्वच संचालकांवर राज्याच्या सहकार खात्याने त्या-त्या वेळी संचालकांवर कारवाई केलीय, त्यामुळेच निवडणूकातुन काय साध्य होणार आहे.

     कोरोनाच्या संकटातून आत्ताच बाजारपेठ थोडी  सावरली, तरीही बँकेची परिस्थिती अतिशय वाईट आहे, त्यात बँकेवर झालेल्या कारवाईचा अनेक कर्जदार गैरफायदा घेत असून निर्लज्जपणे आम्ही कर्जच घेतले नाही, असा कांगावा करताहेत. रितसर कर्ज घेणारे,  निबंधकासमोर आपली प्रोप्रर्टी तारण ठेवणारे, आज अनाकलनीय भुमिका घेत आहेत, त्यांना राजकारणातून काहींनी फुस दिली, त्याचाच परिणाम वसुलीवर झालाय.

     आणि हा बोजा इतका मोठा आहे की हौसे गवसे निवडुन आलेले संचालक ही परिस्थिती सुधारु शकत नाहीत त्यामुळेच तुर्त या निवडणूका लांबणीवर टाकाव्यात आणी परिस्थिती सुधारेपर्यंत बँकेवर पुर्ववत प्रशासक राहु द्यावा.

     विखे साहेब .. आपणच सहकार मंत्री अमित शाह यांचेकडून  हे काम करु शकता, म्हणूनच आपणास ही विनंती  नवनीत विचार मंचने केली आहे. कृपया बँकेच्या 55,000 सभासदाना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी सुधीर मेहता यांनी केली आहे. सभासदानी ही निवडणूक थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.

COMMENTS