खासदार लोखंडे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार लोखंडे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचेे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर नेवासे तालुक्यात शाई फेकण्याचा प्रयत्न झाला; मात्र शाई फेकण्यासाठी आलेले वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संजय सुखदान यांना पोलिसांनी वेळीच रोखल्याने त्यांना बाटली घेऊन लोखंडे यांच्यापर्यंत जाता आले नाही.

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखाधिकार्‍यांची आत्महत्या ; बनावट सोनेतारणाचा संदर्भ ?, पोलिसांकडून मौन
Sangamner : टोल नाक्याच्या मनमानी कारभाराविरोधात संगमनेरकर एकवटले
तीन प्राध्यापकांना पेटंट तर सेट परिक्षेत सात जणांचे यश

अहमदनगर/प्रतिनिधी: शिर्डी लोकसभा मतदारसंघाचेे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर नेवासे तालुक्यात शाई फेकण्याचा प्रयत्न झाला; मात्र शाई फेकण्यासाठी आलेले वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संजय सुखदान यांना पोलिसांनी वेळीच रोखल्याने त्यांना बाटली घेऊन लोखंडे यांच्यापर्यंत जाता आले नाही. त्यानंतर त्यांची लोखंडे यांच्याशी चर्चा घडवून आणण्यात आली. 

लोखंडे यांनी कोरोना काळात नेवासे तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत सुखदान यांनी हे आंदोलन केले. त्यानंतर झालेल्या चर्चेत सुखदान यांनी जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींच्या कामांची उदाहरणे देत लोखंडे यांना धारेवर धरले. नेवासे येथील पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी लोखंडे यांनी बैठक घेतली. यासाठी अधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. बैठक सुरू असताना सुखदान शाईची बाटली घेऊन लोखंडे यांच्या दिशेने निघाले. त्यांना पोलिसांनी मध्येच अडविले. त्यांच्याकडील बाटली काढून घेतली. त्या वेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाचीही झाली. त्यानंतर सुखदान यांची लोखंडे यांच्याशी चर्चा घडवून आणण्यात आली. कोरोना काळात खासदार म्हणून तुम्ही नेवासे तालुक्यात काय काम केले, काय दिलासा दिला, असे प्रश्‍न विचारून सुखदान यांनी लोखंडे यांना धारेवर धरले. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, नगरचे संग्राम जगताप, पारनेरचे नीलेश लंके, श्रीरामपूरचे लहू कानडे अशा काही लोकप्रतिनिधींची उदाहरणे देत त्यांनी जसे त्यांच्या मतदारसंघात कोविड सेंटर उभारण्यासाठी काम केले, तसे तुम्ही येथे का केले नाही? असा थेट प्रश्‍न केला. लोकांच्या वेदना समजून घ्या. आम्ही येथे काम करत आहोत, लोकांना मदत करत आहोत, खासदार म्हणून तुमची काहीच जबाबदारी नाही का? हे आम्ही राजकारण म्हणून करीत नाही. संकटात सापडलेल्या लोकांना मदत केली पाहिजे, अशी बाजू सुखदान यांनी मांडली. प्रशासनाच्या कामातील अनेक त्रुटीही त्यांनी दाखवून दिल्या.

बैठकीत काही काळ गोंधळ

खासदार लोखंडे आणि अन्य अधिकारी, पदाधिकार्‍यांनी त्यांना उत्तरे देत शांत करण्याचा प्रयत्न केला. तालुक्यातील सध्याची स्थिती, प्रशासनाचा कारभार याची माहिती देत सुखदान यांनी यात लक्ष घालण्याची मागणी लोखंडे यांच्याकडे केली. यामुळे बैठकीत काही काळ गोंधळ उडाला होता. आपले म्हणणे मांडून झाल्यानंतर सुखदान तेथून निघून गेले. त्यानंतर लोखंडे यांनी बैठक पूर्ण केली.

COMMENTS