खासदार – आमदारांनी काढली केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवलेल्या गुणवंताची खांद्यावर मिरवणूक….

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार – आमदारांनी काढली केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवलेल्या गुणवंताची खांद्यावर मिरवणूक….

प्रतिनिधी : हिंगोली खासदार आणि आमदार गुणग्राहक आणि सगळीकडे अष्टोप्रहर लक्ष देणारे असतील तर मतदार संघातील सर्वच स्तरातील नागरिकांचा उचित  सन्म

Yevla : भीषणअपघात … एसटी व अल्टो कार यांच्यात धडक| LokNews24
नशा करणार्‍या अधिकार्‍याची खात्यांतर्गत चौकशी सुरू
कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी विश्‍वास नांगरे पाटलांची होणार चौकशी

प्रतिनिधी : हिंगोली

खासदार आणि आमदार गुणग्राहक आणि सगळीकडे अष्टोप्रहर लक्ष देणारे असतील तर मतदार संघातील सर्वच स्तरातील नागरिकांचा उचित  सन्मान त्यांच्या हातून केला जातो. याचा प्रत्यय नुकताच हिंगोलीवासीयांनी अनुभवला . निमित्त होते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशोशिखर गाठणाऱ्या हिंगोलीच्या अवघ्या २२ वर्षीय भूमिपुत्र वैभव सुभाष बांगर यांच्या सत्काराचे.

   नुकत्याच निकाल लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचे बंधू नगर परिषद सदस्य सुभाषराव बांगर यांचे चिरंजीव वैभव बांगरने घवघवीत यश मिळविले. त्या बद्दल त्याचा जंगी नागरी सत्कार हिंगोलीवासीयांनी केला. याच कार्यक्रमात हिंगोलीचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील आणि हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा  कळमनुरीचे  आमदार संतोष बांगर यांनी चि.वैभव बांगर याची चक्क खांद्यावरून मिरवणूक काढली. हे आगळे वेगळे दृश्य पाहून सत्कारास आवर्जून उपस्थित राहिलेल्या नागरिकांच्या डोळ्याचे जणू पारणेच फिटले.

      हिंगोली येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास खासदार हेमंत पाटील यांच्यासह कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी चि. वैभव बांगर यांचा सत्कार केला. या कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

COMMENTS