Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खादी ग्रामोद्योगच्या अधिकार्‍यास पाच हजाराची लाच घेताना पकडले

कर्जप्रकरण मंजुरीसाठी 5 हजाराची लाच घेणार्‍या खादी ग्रामोद्योगच्या नगरमधील अधिकार्‍यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा रचून पकडले.

मांडओहोळ धरण भरले, धबधबे सुरु – पर्यटकांचे आकर्षण ठरणार
शिव प्रहार संघटनेच्या चिथावणीखोर वक्तव्याचा ख्रिश्चन समाजाच्या वतीने निषेध नोंदवून कारवाई करण्याची मागणी
नगर अर्बन बँकेचे अधिकारी…आता रडारवर

अहमदनगर/प्रतिनिधी- कर्जप्रकरण मंजुरीसाठी 5 हजाराची लाच घेणार्‍या खादी ग्रामोद्योगच्या नगरमधील अधिकार्‍यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    याबाबतची माहिती अशी की, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत महाराष्ट्र बँकेमध्ये 25 लाख रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी करणारा खादी ग्रामउद्योग नगर विभागातील वर्ग 2चा अधिकारी याला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रंगेहाथ पकडले. रमेश श्रीहरी सुरुंग (वय 45, जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी, वर्ग 2, खादी ग्रामोद्योग कार्यालय, नगर. मूळ रा.फ्लॅट न 103, साई नगरी को-ऑप हौसिंग सोसायटी, वडमुखवडी, दिघी, जिल्हा पुणे) असेच पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. हंगेवाडी (ता. श्रीगोंदा, नगर) येथील तक्रारदार यांनी जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालय नगरमार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती योजने अंतर्गत पेव्हर ब्लॉक व्यवसाय सुरु करण्यासाठी  25 लाख रुपयांचे कर्ज प्रकरण सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र बँक, शाखा हंगेवाडी, ता. श्रीगोंदा येथे दाखल केले आहे. हे प्रकरण अद्याप प्रलंबित असून, ते संबंधित बँक मॅनेजरकडून लवकर मंजूर करुन घेऊन या प्रकरणाची सबसिडी लवकर मिळवून देण्यासाठी आरोपी अधिकार्‍याने तक्रारदाराकडे 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीवरुन दि.31मे रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणीत यातील आरोपी याने तक्रारदाराकडे 5 हजार रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून दि.31 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती-नगर येथे लाचेच्या सापळा रचण्यात आला. याकारवाईत यातील आरोपीने 5 हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली असता आरोपी लोकसेवकाला रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्यासह सहायक सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक शाम पवरे, पोलीस निरीक्षक करांडे, पोलिस नाईक विजय गंगूल, पोलिस अंमलदार रवींद्र निमसे, महिला पोलिस राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक पोलिस अंमलदार राहुल सपट यांच्या पथकाने ही कारवाई केली.

COMMENTS