खाजगी कारखानदारीचे आव्हान सहकारमहर्षी कोल्हे कारखाना समर्थपणे पेलणार : बिपिनदादा कोल्हे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खाजगी कारखानदारीचे आव्हान सहकारमहर्षी कोल्हे कारखाना समर्थपणे पेलणार : बिपिनदादा कोल्हे

कोपरगांव / ता.प्रतिनिधी : माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहकारी साखर कारखानदारीला दिशा देण्याचे काम केले असून सहकारासमोर पुन्हा खाजगीचे आव्हान उभे र

महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त 63 नागरिकांचा नेत्रदानाचा संकल्प
अहमदनगर : साखरपुडा वा लग्नासाठी आता परवानगी गरजेची ; जिल्ह्यातील आठवडे बाजार केले बंद
पालकत्व स्वीकारण्यास असमर्थता दाखवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

कोपरगांव / ता.प्रतिनिधी : माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहकारी साखर कारखानदारीला दिशा देण्याचे काम केले असून सहकारासमोर पुन्हा खाजगीचे आव्हान उभे राहिले आहे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना त्या तुलनेत हे आव्हान समर्थपणे पेलेल आणि राज्यात एक खिड़की योजना राबवणारा पहिला कारखाना असेल अशी ग्वाही संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी दिली. कोल्हे कारखान्यात उसाचे वजन मनुष्यविरहित काट्या द्वारे होणार असून त्याचे नियोजन सुरू असल्याचेही ते म्हणाले.
             सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थलावर सालाबाद प्रमाणे याही वर्षी लक्ष्मीपूजन माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, चालु गळीतास ८ लाख २५ हजार मे. टनाचे उद्दिष्ट दिले असुन त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे व कारखाना येत्या दोन महिन्यात आय एस ओ 9001_2015 प्रक्रिया पूर्ण करेल असे ते म्हणाले. याप्रसंगी तज्ञ संचालक विवेक कोल्हे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, विधिज्ञ रवी बोरावके, संचालक अरुणराव येवले, संजय होन, शिवाजीराव वक्ते, विलास वाबळे, निवृत्ती बनकर, मनेष गाडे, बाळासाहेब वक्ते, विश्वासराव महाले, कामगारनेते मनोहर शिंदे, ज्ञानेश्वर परजणे, फकीरराव बोरनारे, पांडुरंगशास्त्री शिंदे, शिवाजीराव बारहाते, त्र्यंबकराव परजणे, विजय आढाव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, रिपाईचे दीपक गायकवाड, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे विविध संस्थांचे आजी-माजी संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते खातेप्रमुख, उप खातेप्रमुख, सभासद कामगार प्रतिष्ठित व्यापारी उपस्थित होते. लेखापाल एस. एन. पवार यांनी रोखपाल डी. डी. बोरणारे व आर. टी. गवारे यांना माजीमंत्री कोल्हे यांच्या हस्ते रोख बक्षीस दिले.
           श्री. बिपिनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, सहकारमहर्षि कोल्हे कारखान्याची अत्याधुनिकरनाकडे वाटचाल सुरू असून संचालक मंडळ, व्यवस्थापन, शेतकी, उस विकास विभागाने शेतक-यांचे प्रती हेक्टरी उस उत्पादन वाढविण्यासाठी धडक कृती कार्यक्रम हाती घेत ८६०३२, ११०१५, १२१२५ या ऊस लागवडीवर भर देऊन पुढील पाच वर्षात कोल्हे कारखाना जिल्हयात नंबर वन मध्ये दिसेल. कारखान्यांने उसाची गव्हाण ते कार्यालय या सर्व विभागांचे अत्याधुनिकरण, संगणकीकरण करून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना राबविणारा राज्यातील पहिलाच कारखाना ठरणार आहे. केंद्र शासनाबरोबर 90 लाख लिटर इथेनॉल पुरवण्या बाबतचा करार केला आहे व पाच लाख टन कच्ची साखर निर्यात करणार आहे असे सांगून त्यांनी कोरोना महामारीत कारखाना व्यवस्थापनाने केलेल्या कामाची माहिती देऊन कामगारांचे शंभर टक्के दोन्ही लसींचे लसीकरण पूर्ण केले असल्याचे सांगितले. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले

COMMENTS