खड्डय़ांमुळे तीन चाकी मालवाहू  टेम्पो पलटला.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खड्डय़ांमुळे तीन चाकी मालवाहू टेम्पो पलटला.

खड्डय़ांमुळे तीन चाकी मालवाहून टेम्पो पलटला घटना सीसीटीव्हीत कैद

 कल्याण  प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीत(Kalyan Dombivali) रस्त्यावरील खड्डय़ांमुळे नागरीक हैराण झाले आहेत. कल्याण पूर्वेकडील मलंग रोडवर(Malang Road) दे

भीषण अपघात ! तब्बल १५० फूट खोल दरीत कोसळला ट्रक.
खड्ड्यामुळे तोल गेल्याने मागून येणाऱ्या बसने तरुणाला चिरडलं.
कोंढवा परिसरातील अपघातात एकाचा मृत्यू

 कल्याण  प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीत(Kalyan Dombivali) रस्त्यावरील खड्डय़ांमुळे नागरीक हैराण झाले आहेत. कल्याण पूर्वेकडील मलंग रोडवर(Malang Road) देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत . वाहनचालकांना या खड्ड्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते . मलंग रोड वरील द्वारली गावानजीक रस्त्यावरील खड्डय़ातून मार्ग काढत असताना एक  तीन चाकी टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने जिवीत हानी झालेली नसली तरी याच रस्त्यावर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात गेल्या काही वर्षात अनेकांचा जीव गेला होता. लवकरात लवकर खड्डे बुजविले नाही तर नागरिकांसोबत खड्ड्यात बसूनच आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक कुणाल पाटील(Former corporator Kunal Patil) यांनी दिला आहे.

COMMENTS