ठाणे प्रतिनिधी- केडीएमटी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. नेवाळी खोणी(Newal fields) गावातील नाक्याजवळ ही दुर्दैवी घटना घडली. सदर तरुण हा दुचाकीवरु
ठाणे प्रतिनिधी- केडीएमटी बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. नेवाळी खोणी(Newal fields) गावातील नाक्याजवळ ही दुर्दैवी घटना घडली. सदर तरुण हा दुचाकीवरुन जात होता. खड्ड्यामुळे या तरुणाच्या गाडीचा तोल गेला आणि त्यानंतर मागून येणाऱ्या बसने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे. खड्ड्यामुळे तोल जाऊन हा अपघात घडला की बस चालकाच्या चुकीने तरुणाच्या दुचाकीला धडक दिली, याचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे.

COMMENTS