Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खड्ड्याचा अंदाज न आल्याने ऑटो पडला खड्ड्यात .

बुलढाण्यातील पैनगंगा नदीच्या खड्ड्यात ऑटो पडला

 बुलढाणा(Buldhana) तालुक्यातील अफजलपुर वाडी(Afzalpur Wadi) या गावी जाण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (Mukhyamantri Gramsadak Yojana)अंतर्गत नवीन

कन्नड औट्रम घाटात 300 फुट दरीत कोसळली कार; 4 ठार, 7 जण गंभीर जखमी
कंटेनरला ओव्हरटेक करताना धक्का लागून दोघे चिरडले
समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू

 बुलढाणा(Buldhana) तालुक्यातील अफजलपुर वाडी(Afzalpur Wadi) या गावी जाण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (Mukhyamantri Gramsadak Yojana)अंतर्गत नवीन रस्ता व पैनगंगा(Panganga) नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे . पुलाच्या या नवीन बांधकामा जवळच बुलढाणा-अजिंठा(Buldhana-Ajanta) या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी नदीचे खोलीकरण करून गौण खनिज(Secondary minerals)  वापरण्यात आले होते . रस्त्याच्या शेजारी नदीत खोल खड्डा पडलेला आहे . मुसळधार पाऊस पडल्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने अफजलपुरवाडी(Afzalpurwadi) कडे जात असलेला एक ऑटो या खड्ड्यात पडला. या ऑटो मध्ये देऊळघाट येथील चालक शेख फरहान शेख आवेस(Sheikh Farhan Sheikh Aves) पूर्ण बुडाले होते . ही घटना लक्षात येताच त्या ठिकाणी हजर नागरिकांनी धाव घेऊन ऑटो चालकाला बाहेर काढले व नंतर ऑटो ही पाण्याबाहेर काढण्यात आला आहे . सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही . संबंधित पुलाच्या  बांधकामा जवळ दोन्ही बाजूने सेफ्टी गार्ड(Safety guard) लावण्यात यावे जेणेकरून भविष्यात अनुचित घटना घडणार नाही , अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलडाणा तालुका अध्यक्ष आकाश माळोदे(Akash Malode) यांनी केली आहे.

COMMENTS